मुंबई - शहरातील पश्चिम उपनगरात मोठ्या संख्येने राहत असलेल्या गुजराती भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी विविध संमेलनाला भेट दिली. आज त्यांनी जोगेश्वरीत गुजरात समाज भवनमध्ये गुजरातच्या उद्योगपतींची मिटिंग घेतली. यानंतर त्यांनी अंधेरी, विलेपार्ले व बिकेसीत, हिरेव्यापारी उद्योगपतींनी आयोजित केलेल्या गुजराती समाज संमेलनाला भेट दिली.
..म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची गुजराती संमेलनाला भेट - मुबंई भाजप बातमी
मुंबईतील गुजराती भाषीक मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रचार केला जात आहे. त्यांनी गुजराती संमेलनाला भेट दिली.

उत्तर मुंबईतील काँग्रेसची एकमेव जागा जिंकण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिग्गज नेते व अभिनेत्यांना प्रचारात उतरवले जात आहे. आज मालाड विधानसभा भाजपचे उमेदवार रमेश सिंह ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित रोड शो मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी सहभागी झाले. यावेळी त्यांनी मालाडच्या जैन देरासार मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी देखील रॅलीच्या माध्यमातून लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी आव्हान केले.