मुंबई -कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. आता राज्यभरातील शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भातील प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे अखेर राज्यभरातील शाळांची घंटा वाजणार आहे.
हेही वाचा -Schools Reopen : राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार
कोरोना नियमावलीचे करावे लागणार पालन -
याआधीही शाळा सुरू करण्यापूर्वी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्याबाबतची तयारी शिक्षण विभागाला करायची आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइज करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे अशी तयारी शिक्षण विभागाला पूर्ण करायची आहे. स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या आदेशानुसार होणार आहे.
मार्गदर्शक सूचना-
- शाळा सुरु झाल्यानंतर टप्प्याटप्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येणार आहे. कोरोनासंबंधी नियमांचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आदीचा समावेश आहे.
- सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे यासाठी एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसता येणार आहे. दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर असायला हवे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी बसू शकतील. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे हे नियम पाळवे लागणार आहेत.
- कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावेत. विविध सत्रात वर्ग भरवावेत.
- एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फुट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे.
- संबंधीत शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
- शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.
- शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषयक SOP चे पालन करावे.
- विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळला, तर अशा मुलांसाठी आयसोलेशन सेंटर करावे. स्थानिक डॉक्टरांचे क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. शाळांनी अशा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- विद्यार्थ्यांचे तापमान वारंवार चेक करत राहावे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक डॉक्टर आहेत, अशा पालकांनी शाळांमध्ये स्वत:हून सहभागी होऊन या संदर्भात मदतीचा हात पुढे करावा.
- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीचे दोन डोस व्हायला हवेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेतली जावी.
- विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे, विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी शाळेनं सक्ती न करणे, विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर ठेवणे, शक्य असेल तिथे एक दिवसाआड शाळा भरवणे.
हेही वाचा -पुन्हा घंटा वाजणार.. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू, मात्र.. शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली