महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईच्या पालकमंत्र्याकडून जम्बो कोविड सेंटरच्या जागेची पाहणी, चार नवीन कोविड सेंटर उभारले जाणार - News about Mumbai Kovid Center

मुंबईच्या पालकमंत्र्याकडून जम्बो कोविड सेंटरच्या जागेची पाहणी करण्यात आली. शहरात चार नवीन कोविड सेंटर उभारले जाणार आहेत.

मुंबई
मुंबई

By

Published : Apr 22, 2021, 5:25 PM IST

मुंबई - पालकमंत्री असलम शेख यांनी मलाडमध्ये होणाऱ्या जम्बो कोविड सेंटरच्या जागेची पाहणी केली असून, येत्या दीड महिन्यात जम्बो कोविड सेंटर सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या व्यतिरिक्त अजून तीन जम्बो कोविड सेंटर मुंबई सुरू होणार असून, या चारही जम्बो कोविड सेंटरमध्ये एकूण 5300 बेडची क्षमता असणार आहे.

मुंबईमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, मुंबईत नवीन चार जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापैकी मलाडमधील जम्बो कोविड सेंटरच्या जागेची पाहणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली. मलाडमध्ये 2 हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर येत्या दीड महिन्यात उभारणार असल्याची माहिती यावेळी अस्लम शेख यांनी दिली आहे. तसेच मुंबईत एकूण चार जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत. मलाड, कांजुर मार्ग, महालक्ष्मी आणि चुनाभट्टी येथील सोमय्या मैदान येथे नवीन जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार असून या चारही जम्बो कोविड सेंटरमध्ये एकूण 5 हजार 300 एवढ्या बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. मात्र, राज्य सरकारने केंद्र सरकारकडून अतिरिक्त ऑक्सिजनची मागणी केली असून लवकरच ही मागणी पूर्ण होणार असल्याचे देखील यावेळी असलम शेख यांनी सांगितले. ऑक्सिजनची मागणी पूर्ण झाली तर राज्यभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही -

राज्यातसध्या संचार बंदीचे नियम लावण्यात आले होते. मात्र, गेल्या एक आठवड्यापासून नियम लावले असले तरी, नियम गांभीर्याने नागरिक घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आज रात्री आठ वाजल्या पासून राज्यभरात कडक लॉक डाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. नागरिकांनी या लॉक डाऊनला प्रतिसाद देण्याची गरज आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. ती रुग्णसंख्या आटोक्यात आणायची असेल तर, नागरिकांचे सहकार्य गरजेचे असल्याचे मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी म्हंटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details