महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पालकमंत्री बदलणे काय भाजीपाला आहे का?; उजनी पाणी प्रश्नावरून मंत्री दत्तात्रय भरणे भडकले - अहिल्यादेवी होळकर

उजनी पाण्याचा प्रश्न सोलापुरात ज्वलंत झाला आहे. लाकडी निंबोळी योजनेंतर्गत उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर आणि बारामती येथे वळवण्यात आले आहे. यावरून सोलापुरात पालकमंत्री बदलाबाबत मागणी होत आहे. उजनी धारणातील पाणी वळू देणार कुठेही जाऊ देणार नाही, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती. पालकमंत्री बदलले जाणार का, असा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला असता मंत्री दत्तात्रय भरणे भडकले. पालकमंत्री बदलणे एवढे सोपे नव्हे, काय भाजीपाला आहे का, असे उत्तर पालकमत्र्यांनी ( Guardian Minister Dattatray Bharane ) माध्यमांना दिले. पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. पद बदलणे एवढे सोपे नाही, असेही त्यांनी विरोध करणाऱ्यांना टोला दिला.

पालकमंत्री
पालकमंत्री

By

Published : May 28, 2022, 4:46 PM IST

सोलापूर- उजनी पाण्याचा प्रश्न सोलापुरात ज्वलंत झाला आहे. लाकडी निंबोळी योजनेंतर्गत उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर आणि बारामती येथे वळवण्यात आले आहे. यावरून सोलापुरात पालकमंत्री बदलाबाबत मागणी होत आहे. उजनी धारणातील पाणी वळू देणार कुठेही जाऊ देणार नाही, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती. पालकमंत्री बदलले जाणार का, असा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला असता मंत्री दत्तात्रय भरणे भडकले. पालकमंत्री बदलणे एवढे सोपे नव्हे, काय भाजीपाला आहे का, असे उत्तर पालकमत्र्यांनी ( Guardian Minister Dattatray Bharane ) माध्यमांना दिले. पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. पद बदलणे एवढे सोपे नाही, असेही त्यांनी विरोध करणाऱ्यांना टोला दिला.

बोलताना पालकमंत्री भरणे

प्रणिती शिंदेंना पालकमंत्र्यांचे सौम्य उत्तर- सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे ( MLA Praniti Shinde ) यांनी यापूर्वी उजनी पाणी प्रश्नावरून आपला संताप व्यक्त केला होता. सोलापूरच्या हक्काचे पाणी कोणी पळवत असेल तर आम्ही रान पेटवू, असा इशारा दिला होता. त्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, आमदार प्रणिती शिंदे या खूप अभ्यासू आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांचे काहीतरी गैरसमज झाला असेल. आमदार प्रणिती शिंदे यांनी सिंचन विभागाकडून माहिती घ्यावी, त्यांचा गैरसमज दूर होईल, असे पालकमत्र्यांनी सांगितले.

पालकमत्र्यांचा सोलापूर दौरा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. पार्क चौक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, स्मार्ट सिटीचे सीईओ ढेंगळे पाटील आदी अधिकाऱ्यांसोबत नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन आढावा बैठक घेतली आणि योग्य त्या सूचना दिल्या.

हेही वाचा -ujani dam water : कुंकवाच्या पाण्याने केला पालकमत्र्यांच्या प्रतिमेचे जलाभिषेक

ABOUT THE AUTHOR

...view details