मुंबई -राज्यासह मुंबईमध्ये कोरोना वाढत आहे. रुग्णाची वाढती संख्या पाहता कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच महानगरपालिकेकडून करण्यात आले. मात्र, अजूनही मुख्यमंत्री तसेच महानगरपालिकेच्या अहवानाकडे जनता गांभीर्याने घेत नसून नाईलाजास्तव आम्हाला कारवाई करावी लागत आल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले. गेल्या काही आठवड्यांआधी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू कमी होत होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. म्हणूनच जनतेला नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, या आवाहनाला जनतेकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे. म्हणूनच मंगल कार्यालय, लग्न सोहळे आणि नाईट क्लब किंवा इतर जे काही कार्यक्रम असतील त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.
अनलॉक नंतर हळू हळू सेवा राज्य सरकारकडून सुरू करण्यात आल्या. मात्र, या सेवा सुरू झाल्यानंतर जणू काही कोरोना आता गेला आहे, या अविर्भावात जनता वावरत आहे. यामुळे कोरोनाचा पुन्हा एकदा शिरगाव पाहायला मिळतोय. म्हणूनच आता नियम काटेकोरपणे पालन केल्याशिवाय पर्याय नाही. जनतेकडून नियमांचे करण्यात आले नाही तर लोकं शिवाय पर्याय नाही असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले. सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.