महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'धार्मिक स्थळं सुरू करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार' - मुंबईत धार्मिक स्थळं होणार सुरू

मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत मंत्री शेख यांच्या दालनात सोमवारी बैठक पार पडली. यावेळी अस्लम शेख यांनी धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या मुद्द्याचा सरकार गांभीर्यांने विचार करत असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.

mumbai
पालकमंत्री अस्लम शेख

By

Published : Aug 17, 2020, 7:20 PM IST

मुंबई - कोविड विषाणू नियंत्रणासाठी लॉकडाऊन सुरू केला. त्यानंतर अनलॉक सुरू केला असतानाही मॉल सुरू झाले. परंतु धार्मिक स्थळे सुरू झाले नाहीत. आता विरोधी पक्षाचा आरोप खोडून काढण्यासाठी मुंबईसह राज्यातील धार्मिक स्थळं पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत मंत्री शेख यांच्या दालनात सोमवारी बैठक पार पडली. त्यानंतर अस्लम शेख बोलत होते.

या बैठकीला मिनारा मशिदीचे विश्वस्त मोहमद असिफ मेमन, अब्दुल वहाब लतिफ, जामा मशिदीचे चेअरमन शोहेब खातिब, जामा मशिदीचे विश्वस्त नाजिर तुंगेकर, साबिर निरमन आदी उपस्थित होते.

ऐतिहासिक मिनारा मशिदीचे विश्वस्त आसिफ मेमन यांनी फर्ज नमाजसाठी विशिष्ट वेळा ठरवून देण्याची मागणी केली. तर जामा मशिदीचे शोहेब खतिब यांनी देशभरामध्ये चालू असलेल्या अनलाॅकच्या प्रक्रिये अंतर्गत मशिदींबरोबरच अन्य धर्मांची धार्मिक स्थळं दर्शनासाठी खुली करण्याची मागणी केली. अस्लम शेख यांनी धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या मुद्द्याचा सरकार गांभीर्यांने विचार करत असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details