महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik : वानखेडे कुटुंबीयांबाबत वक्तव्य करणार नाही; नवाब मलिकांचे न्यायालयात हमीपत्र - Wankhede family

नवाब मलिक ( Nawab Malik ) यांनी उच्च न्यायालयात हमीपत्र दाखल केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, मी यापुढे समीर वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल कुठलीही पोस्ट करणार नाही.

Nawab Malik
नवाब मलिक

By

Published : Nov 25, 2021, 1:09 PM IST

Updated : Nov 25, 2021, 5:24 PM IST

मुंबई - नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात हमीपत्र दाखल केले आहे. यामध्ये ते म्हणाले की, मी यापुढे समीर वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल कुठलीही पोस्ट करणार नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तसेच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Minority Minister Nawab Malik ) यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात हमीपत्र देण्यात आले आहे. या हमीपत्रात 9 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीपर्यंत समीर वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत कोणतेही वक्तव्य प्रसारमाध्यमांवर किंवा सोशल मीडियावर करणार नाही असे लिखित स्वरूपात देण्यात आले आहे.

9 डिसेंबरपर्यंत करणार नाहीत वक्तव्य -

नवाब मलिक यांच्यावर ज्ञानदेव वानखेडे यांनी मानहानीचा दावा केला असून, नवाब मलिक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या कुटुंबांची बदनामी करत आहेत. आपल्या कुटुंबाची माहिती सार्वजनिक करत असून याचा आपल्या कुटुंबाला त्रास होत असल्याचा दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात केला होता. या प्रकरणावर सुनावणी दरम्यान कोर्टाने नवाब मलिक यांना 9 डिसेंबरच्या पुढील सुनावणी पर्यंत वानखेडे कुटुंबीयाबाबत कोणतेही वक्तव्य सोशल मीडियावर करणार नाही याबाबत हमीपत्र देण्यात आला आहे.

नवाब मलिकांनी केले होते ट्वीट -

दरम्यान, आज सकाळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांनी वानखडे कुटुंबीयांवर अजून एक आरोप (allegation against Wankhade family) केला होता. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या आईचे दोन मृत्यूचे दाखले असल्याचा आरोप ट्विट करून केला आहे. त्यात अंत्यसंस्कारात मुस्लीम असल्याचे नमूद केले आहे. मलिक यांनी म्हटले की, अंत्यसंस्कारावेळी मुस्लीम आणि नोकरीसाठी हिंदू असल्याचा दाखल वानखेडे यांनी तयार केला असून हा फर्जीवाडा असल्याचे ट्विट त्यांनी केले होते.

हेही वाचा -Nawab Malik Tweet : 'धन्य है दाऊद ज्ञानदेव...' मलिक यांच्याकडून आणखी एक खुलासा

Last Updated : Nov 25, 2021, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details