महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील 'कंटेन्मेंट झोन'चा ग्राऊंड झिरो आढावा... - मुंबई कोरोना व्हायरस न्यूज

'कंटेनमेंट झोन' लगतच्या परिसरात परिस्थितीनुरुप गरजेचे वाटल्यास उर्वरित क्षेत्र बफर झोन म्हणून जाहीर करून त्यावर देखरेख ठेवली जात आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा 728 चाळी आणि झोपडपट्टी असलेल्या विभागात कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत.

bmc corona
मुंबईतील 'कंटेन्मेंट झोन'

By

Published : Jun 29, 2020, 8:16 PM IST

Updated : Jun 30, 2020, 6:30 PM IST

मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात सर्वात जास्त रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे पाऊल उचलले आहे. मुंबईमध्ये ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळलेला आहे, अशा ठिकाणापासून आणि परिस्थितीनुरूप ठराविक परिघातील क्षेत्र हे बाधित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येत आहे. हे क्षेत्र 'कंटेन्मेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

'कंटेनमेंट झोन' लगतच्या परिसरात परिस्थितीनुरुप गरजेचे वाटल्यास उर्वरित क्षेत्र बफर झोन म्हणून जाहीर करून त्यावर देखरेख ठेवली जात आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा 728 चाळी आणि झोपडपट्टी असलेल्या विभागात कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 5646 इमारतीमधील माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सील करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी मुंबईतील 'कंटेन्मेंट झोन'चा ग्राऊंड झिरोवरून घेतलेला आढावा...

कंटेन्मेंट झोनमध्ये काय केली जाते कार्यवाही

  • जे क्षेत्र 'कंटेन्मेंट झोन' म्हणून जाहीर झाले आहेत, त्या क्षेत्रातील महत्त्वाच्या व दर्शनीय जागी ठळक अक्षरात सूचना फलक लावण्यात येत आहे.
  • प्रत्येक 'कंटेन्मेंट झोन'च्या व्यवस्थापनासाठी एक 'कंटेन्मेंट ऑफिसर' नेमण्यात आला आहे. तसेच त्यांच्या सोबतीला आवश्यक ते कर्मचारी व पोलीस यांचा समावेश असलेले पथक कार्यरत आहे.
  • 'कंटेन्मेंट झोन' परिसरातील बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य व संपर्कातील नजीकच्या व्यक्ती यांची 'हाय रिस्क' आणि 'लो रिस्क' अशा दोन गटात विभागणी करण्यात येत आहे. या दोन्ही गटातील व्यक्तींना विभागीय स्तरावर अधिग्रहित करून तयार करण्यात आलेल्या विलगीकरण सुविधेमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. तथापि हे विलगीकरण करताना इतरांना त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
  • 'कंटेन्मेंट झोन' मधील उर्वरीत लोकसंख्येसाठी पडताळणी व तपासणी शिबिरे आयोजित करून त्यामध्ये लक्षणे आढळलेल्या व्यक्तींवर देखील वैद्यकीय उपचारक्रमानुसार उपचार करण्यात येत आहेत.
  • कंटेन्मेंट परिसरात असणारी दवाखाने किंवा रुग्णालये इत्यादी ठिकाणी येणाऱ्या रुग्णांपैकी फ्लू सदृश आजाराच्या रुग्णांची दैनंदिन माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडे नियमितपणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • बाधित व्यक्तीच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींना महापालिकेने ताब्यात घेतलेल्या हॉटेल्स, लॉज, वसतिगृहे इत्यादी ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही परिस्थितीसापेक्ष व गरजेनुसार करण्यात येत आहे.
  • स्थलांतरित करण्यात आलेल्या व्यक्तींच्या खानपानाचे व वैद्यकीय सेवा सुविधेचे व्यवस्थापन हे महापालिकेच्या विभाग स्तरावरून नियमितपणे करण्यात येत आहे.
  • कोणत्या 'कंटेन्मेंट झोन' मधील किती लोकांना, कुठे स्थलांतरित करण्यात आले आहे? याबाबतची माहिती नियमितपणे अद्ययावत करण्यात येत आहे.
  • 'कंटेन्मेंट झोन' मधील इमारती व त्यातील निवासस्थान यांना नियमितपणे भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचबरोबर या झोनमधील लोकसंख्येचे रोजच्या रोज सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले असून, हे काम सलग 14 दिवस करायचे आहे.
  • सर्वेक्षणासाठी आवश्यक तेवढ्या पथकांची निर्मिती करून प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी समाविष्ट करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणादरम्यान ज्या व्यक्तींमध्ये फ्लू सदृश्य आजाराची लक्षणे आढळून येतील त्यांच्यावर वैद्यकीय उपचार क्रमानुसार उपचार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
  • 'कंटेन्मेंट झोन' परिसरातील नागरिकांसाठी प्रभावी आरोग्य शिक्षण मोहीम नियमितपणे राबवण्यात येत आहे.
  • 'कंटेन्मेंट झोन' परिसरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांच्या वस्तू निशुल्क पद्धतीने देण्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. यासाठी पोलिसांसह गॅस एजन्सी, दूध पुरवठादार, अन्नधान्य-भाजीपाला विक्रेते इत्यादींची मदत घेतली जात आहे.
Last Updated : Jun 30, 2020, 6:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details