महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate ; एपीएमसी मार्केटमध्ये वाटाण्याचे दर घसरले, मुसळधार पावसाने भाजीपाल्याची आवक घटली

आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाण्याचे दर एक हजार रुपयांनी कमी झाले. तर मेथी, वालाच्या शेंगांचे दर वाढले आहेत. मुसळधार पावसामुळे आगामी काळात भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांच्या किमती गगणाला भिडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai APMC Market Rate
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

By

Published : Jul 16, 2022, 7:53 AM IST

नवी मुंबई -मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मेथीचे दर १०० जुड्यांप्रमाणे पाचशे रुपयांनी कमी झाले. वालाच्या (पावटा) शेंगाचे दर १०० किलोंप्रमाणे ५०० रुपयांनी वाढले आहे. दुसरीकडे वाटाण्याचे दर १००० रुपयांनी कमी झाले आहेत. तर तोंडलीचे दर दीड हजार रुपयांनी कमी झाले आहेत. घेवड्याचे दर हजार रुपयांनी कमी झाले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत.

  • भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

  • भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २९०० ते ३२०० रुपये
  • भेंडी नंबर १प्रति १०० किलो ४१०० ते ४८०० रुपये
  • लिंबू प्रति १०० किलो ४७०० ते ५५०० रुपये
  • फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
    ८५००० ते १०००० रुपये
  • फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये
  • गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३२०० रुपये
  • गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४७०० ते ६०००
  • घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
  • कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये
  • काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
  • काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० ते १४०० रुपये
  • कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३६०० रुपये
  • कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८०० रुपये
  • कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० ते १६०० रुपये
  • कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
  • ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३६०० रुपये
  • पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३०००रुपये
  • रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३६००रुपये
  • शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४५०० रुपये
  • शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते ३००० रुपये
  • सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २६०० रुपये
  • टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २६०० रुपये
  • टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २०००रुपये
  • तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ४५०० रुपये
  • तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
  • वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १०,०००ते १२००० रुपये
  • वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६०००रुपये
  • वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
  • वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००
  • वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते १८०० रुपये
  • मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३५००ते ४००० रुपये
  • मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २६०० रुपये


    पालेभाज्या
  • कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २८०० रुपये
  • कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
  • कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २२०० रुपये
  • कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १२००
  • मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १५०० ते २००० रुपये
  • मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८००ते १२०० रुपये
  • मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २००० रुपये
  • पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये
  • पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये
  • पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ६०० रुपये
  • शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
  • शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details