मुंबई - समाजशास्त्र, मानसशास्त्र, कायद्याविषयी अधिक माहिती मिळावी यासाठी भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञानस्रोत केंद्र, एस.एन.डी.टी महिला विद्यापीठातर्फे ग्रंथोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवामध्ये 20 हजार पेक्षा जास्त ग्रंथ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वाचनाबाबत गोडी निर्माण व्हावी हा या ग्रंथोत्सवामागचा मुख्य उद्देश होता.
वाचनाची गोडी लागण्यासाठी 'एसएनडीटी'त ग्रंथोत्सव - ग्रंथोत्सव मुंबई
समाजशास्त्र, मानसशास्त्र, कायद्याविषयी अधिक माहिती मिळावी यासाठी भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञानस्रोत केंद्र, एस.एन.डी.टी महिला विद्यापीठातर्फे ग्रंथोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले होते.
ग्रंथोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दीपक देशपांडे यांनी केले. "आजची तरुणाई आणि वाचन संस्कृती" या विषयावर सुप्रसिद्ध लेखिका नीरजा यांनी मार्गदर्शन केले.
तरुणपिढी वाचनाच्या जवळ यावी यासाठी ग्रंथोत्सव घेण्यात आला. या ग्रंथोत्सवमध्ये 20 हजार पुस्तके ठेवण्यात आली होती. मराठी, इंग्लिश भाषेतील ही ग्रंथ होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात ही ग्रंथ विकत घेतले याचा आनंद आहे. आम्ही देखील आमच्या ग्रंथालयासाठी काही पुस्तके शिक्षकांच्या निवडीनुसार विकत घेतली आहेत. तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी देखील आम्ही तज्ञाचे मार्गदर्शन ठेवले होते, असे एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक सुभाष चव्हाण यांनी सांगितले.