महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नातवाबरोबरचा आजोबा मुकेश अंबानींचा फोटो व्हायरल - Mukesh Ambani viral photo

आजोबा बनलेल्या मुकेश अंबानींनी नातवाबरोबर पहिला फोटो काढला, जो सोशलवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Mukesh Ambani
Mukesh Ambani

By

Published : Dec 11, 2020, 3:46 PM IST

मुंबई - अब्ज डॉलरचे व्यापारी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​(आरआयएल)चे अध्यक्ष मुकेश अंबानी गुरुवारी आजोबा झाले. त्यांचा मोठा मुलगा आकाश यांना मुलगा झाला. अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्याने सांगितले, "श्लोका आणि आकाश अंबानी मुंबईत मुलाचे पालक बनले आहेत. नीता आणि मुकेश अंबानी पहिल्यांदा आजी आजोबा झाल्याने आनंद झाला. नवीन मुलाच्या आगमनाने मेहता आणि अंबानी कुटुंबीयांमध्ये मोठा आनंद झाला आहे. आई आणि मुलगा दोघेही ठीक आहेत." आकाश पिता झाला तर त्याचे वडील मुकेश यांच्या आनंदाला पारावार नव्हता.

मिम्स आणि कमेंट्स

आजोबा बनलेल्या मुकेश अंबानींनी नातवाबरोबर पहिला फोटो काढला, जो सोशलवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर मिम्स आणि कमेंट्सही होत आहेत. काही लोक विनोदाने म्हणाले, की आजोबा होण्याच्या आनंदात आपण (मुकेश अंबानी) जियो सेवा एक वर्षासाठी विनामूल्य करा.

अभिनंदनाचा वर्षाव

आकाश आणि श्लोकाचे मार्च 2019मध्ये लग्न झाले. आकाश आणि श्लोका यांचे मुलाच्या आगमनाबद्दल दिवसभर अभिनंदन होत आहे. 63 वर्षीय मुकेश आणि पत्नी नीता अंबानी यांना तीन मुले आहेत, त्यांत जुळी मुले आकाश आणि ईशा आहे. हे दोघेही 29 वर्षांचे आहेत. त्याचवेळी तिसरा मुलगा अनंत 25 वर्षांचा आहे. गेल्या महिन्यात दिवाळीच्या अगोदर अंबानी कुटुंब परदेशातून मुंबईला परतले.

ABOUT THE AUTHOR

...view details