मुंबई - मरीन ड्राईव्ह येथे जवाहर बाल भवन शेजारच्या भूखंडावर भव्य आणि दिमाखदार असे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
मरीन ड्राईव्हवर उभारणार भव्य मराठी भाषा भवन - अजित पवार - Ajit Pawar Latest News Mumbai
मरीन ड्राईव्ह येथे जवाहर बाल भवन शेजारच्या भूखंडावर भव्य आणि दिमाखदार असे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
मरीन ड्राईव्ह येथे भाषा भवन
मुंबईत मराठी भाषा भवन नसल्याची खंत शिवसेना सदस्य दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत, मराठी भाषा भवनाची घोषणा केली. सुरुवातीला धोबी तलाव रंगभवन येथे मराठी भाषा भवन उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र या वास्तूला वारसा वास्तूचा दर्जा असल्यामुळे आणि बाजूलाच रुग्णालय असल्याने तिथे मराठी भाषा भवन उभारता येऊ शकत नाही. त्यामुळे चर्नी रोड स्टेशनच्या बाहेर असलेल्या जवाहर बाल भवन शेजारील भूखंडावर दिमाखदार मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. दरम्यान या घोषनेनंतर विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आभार मानले.