मुंबई - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये ( Grampanchayat Election Result ) शिंदे गटाने 40 जागांवर बाजी मारली( Shinde Group Win 40 Seats Grampanchayat Election ) आहे. तर, शिवसेनेला 27 जागा मिळवता ( Shivsena Win 27 Seats Grampanchayat Election ) आल्या आहेत. यामुळे शिंदे गटाने बाजी मारली, अशी चर्चा सुरू आहे. तरी, हे चित्र तात्पुरते आहे, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं.
'शिवसेनेला उमेदवार जिंकून आणणे जड जाईल...' - राज्यात अद्यापही सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून, केवळ दोनच मंत्री राज्याचा कारभार हाकत आहे. अशा वेळेस राज्यात झालेल्या 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजपने 82 जागा जिंकले आहेत. तर त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने 53 जागी विजय मिळवला आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्षातील बंडा नंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत 40 जागा मिळवल्या आहेत. तर, शिवसेना पक्षाला 27 जागा मिळाल्या असून, काँग्रेस 22 जागांसह शेवटच्या स्थानावर फेकला गेला आहे. यामुळे आता राज्यात शिंदे गटाची सरशी होत असून, शिवसेना पिछाडीवर पडली आहे. याप्रमाणेच चित्र राहिले तर आगामी निवडणुकीत शिवसेनेला उमेदवार जिंकून आणणे जड जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. असे असले तरी या निवडणुकींच्या निकालांवर फारसे न जाता आगामी निवडणुका कशाच्या चिन्हावर आणि बळावर लढल्या जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असं विश्लेषकांचे मत आहे.
'शिवसेनेला नाहीतर शिंदे गटाला धक्का' -नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का बसल्या असल्याची चर्चा आहे. तरी प्रत्यक्षात शिंदे गटाला धक्का बसला आहे, असे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापिका मनिषा कायंदे यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा सेटबॅक बसला असून जळगाव या जिल्ह्यात 'भोपळा' फोडता आला नाही, असे कायंदे म्हणाल्या. जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाला एकाही ठिकाणी खाते उघडता आले नाही.