महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीची सरशी, राष्ट्रवादी दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर, भाजप आणि शिंदे गटाचाही करिष्मा - राष्ट्रवादी दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्रातील ५४७ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे (Mahavikas Aghadi at top). राष्ट्रवादी आणि भाजपने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ढेपाळली आहे. तर शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने प्रथमच चाळीस ग्रामपंचायतींच्या जागांवर विजय मिळवला आहे. स्थानिक आघाड्यांनी काही ठिकाणी सत्ता काबिज केली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीची सरशी
राज्यातील ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीची सरशी

By

Published : Sep 19, 2022, 10:29 PM IST

Updated : Sep 19, 2022, 10:55 PM IST

मुंबई - राज्यातील ५४७ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ढेपाळली आहे. तर शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने प्रथमच चाळीस ग्रामपंचायतींच्या जागांवर विजय मिळवला आहे. स्थानिक आघाड्यांनी काही ठिकाणी सत्ता काबिज केली आहे.

राज्यातील ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीची सरशी
भाजपने १४४ ग्रामपंचायती जिंकल्या -महाराष्ट्रात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या पसंतीचा पक्ष ठरला आहे. ६०८ ग्रामपंचायती पैकी ४९५ निकाल समोर आले. भाजपने १४४ ग्रामपंचायती जिंकल्या. तर राष्ट्रवादीने १२६ जागांवर विजय मिळवत दुसऱ्या पसंतीचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने ६२ जागांवर विजयी होत, तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. इतर स्थानिक आघाड्यांनी ८८ जागांवर यश मिळवले आहे. भाजप आणि शिंदे गटाला मिळून १८५ तर महाविकास आघाडीला २२५ जागांवर निर्विवाद यश मिळवले आहे.
जनतेने शिंदे गटाला स्वीकारले -शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटविरोधात राज्यात नाराजी असल्याचे बोलले जात होते. अनेक भागात शिंदे गटाविरोधक आंदोलने, निदर्शने करण्यात आली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. उलट प्रथमच ग्रामपंचायतच्या रिंगणात उतरलेल्या शिंदे गटाला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला ३७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी सर्वच पक्षांकडून होत असलेल्या दाव्यानुसार शिवसेना ढेपाळली असून बंडखोर शिंदे गटाला जनतेने स्वीकारल्याचे बोलले जात आहे.
प्रेरणा देणारा निकाल -युती सरकारची स्थापना होऊन अडीच महिन्याचा कालावधी झालेला आहे. एवढ्या अल्पावधीत सर्वसामान्यांच्या मनाला पटेल असाच कारभार राज्यात सुरु आहे आणि याच कामाची पावती जनतेने ग्रामपंचायतीच्या निकालावरुन दिलेली आहे. या निकालामुळे भविष्यात काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोस्टल रोडच्या कामाच्या पाहणीसाठी आले असता त्यांनी हे सांगितले आहे. तर हे सरकार सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आहे. गेल्या अडीच वर्षात काम केले त्यापेक्षा अधिक पटीने गेल्या अडीच महिन्यात काम केल्याने हा निकाल समोर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Last Updated : Sep 19, 2022, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details