मुंबईराज्यातील 18 जिल्ह्यांमधील 1166 ग्रामपंचायत मध्ये येत्या 13 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. ( State Election Commission ) तर 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मुंबईत केली आहे.
Gram panchayat election 2022 राज्यातील 1166 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बार दिवाळीत उडणार - Gram panchayat election
Gram panchayat election 2022 मुंबई राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक ( Gram panchayat election ) जाहीर, ११६६ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. १३ ऑक्टोंबरला मतदान तर १४ ला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission )जाहीर केले आहे.
कशी असेल निवडणूक प्रक्रिया ?यावेळी बोलताना मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येईल. ( election announced in the state ) शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. ( Gram panchayat election 2022 ) मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.
ग्रामपंचायत मध्ये होणार निवडणूक ? जिल्हा: ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. जिल्हापालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. जिल्हारायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. जिल्हारत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. जिल्हासिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. जिल्हानाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार जिल्हा: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81. पुणे जिल्हा: मुळशी- 1 व मावळ- 1. जिल्हासातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6. कोल्हापूर जिल्हा: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1. अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम जिल्हा: वाशीम- 1. नागपूर जिल्हा: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा जिल्हा: वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर जिल्हा: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा जिल्हा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया जिल्हा: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली जिल्हा: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. एकूण- 1,166. ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होणार आहे असेही मदान यांनी सांगितले आहे.