मुंबई:महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील 581ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रीया रवीवार आणि सोमवारी पार पडली, रवीवारी उत्साहाने मतदान करत गावकऱ्यांनी गावगाडा चालवणाऱ्या कारभाऱ्यांना निवडुन दिले. या निवडणुका पक्षाच्या चिन्हावरहोत नाहीत. स्थानिक पातळीवर पॅनल तयार करुन लोक सदस्यपदासाठी लढतात पण निकाला नंतर कोणती ग्राम पंचायत कोणाच्या ताब्यात आली या वरुन दावे प्रतीदावे केले जातात तसाच प्रकार सध्या पहायला मिळत आहे. सत्ताधारी भाजप व एकनाथ शिंदे गट तसेच उध्दव यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने विजयाचा दावा केला आहे.
आमच्या युतीवर शिक्कामोर्तब : महाराराष्ट्रात 16 जिल्ह्यातील 581 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले त्याचे निकाल सोमवारी जाहीर झाले यात सगळ्यांनीच विजयाचा दावा केला आहे. भाजपने 274 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला तर शिवसेनेच्या शिंदे गटाने इतर 41 जिंकल्याचे म्हणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने अनुक्रमे 62, 37 आणि 12 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने आमच्या शिवसेना आणि भाजप युतीवर शिक्कामोर्तब केले आहे.