मुंबई -गेल्या दोन महिन्यांपासून एसटी महामंडळाला केवळ शंभर कोटी रुपये राज्य सरकारकडून मदत म्हणून दिली जात आहे. वास्तविक एसटी महामंडळाला दर महिन्याला 350 कोटी रुपये राज्य सरकारकडून मदत म्हणून दिली जाते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून केवळ शंभर कोटीच रुपये एसटी महामंडळाला मिळत असल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याकडे राज्य सरकारने (paid on time) तातडीची लक्ष द्यावे (Govt should ensure that salaries of ST employees) असा सल्ला अजीत पवार यांनी (Ajit Pawar) दिला आहे.
अजित पवारांचा सल्ला : यावरून राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील, याकडे राज्य सरकारने तातडीची लक्ष द्यावे असा सल्ला दिला आहे. आपण अर्थमंत्री असताना अर्थसंकल्पात चौदाशे कोटी रुपयांची एसटी महामंडळासाठी तरतूद करण्यात आली होती. संपानंतर एसटीचे पगार स्वखर्चातून होतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे पैसे कमी पडल्यास राज्य सरकार ते पैसे एसटीला देईल असे अर्थमंत्री असताना आपण सांगितले होते. यासाठी अर्थसंकल्पात चौदाशे कोटी रुपयांची तरतूद आपण केली होती. तसेच शिंदे सरकारने देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजार कोटी रुपयांची तरतूद एसटीसाठी केली आहे. त्यामुळे एकूण 2400 कोटी रुपयांची तरतूद एसटीसाठी झाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत, याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे असा सल्ला अजित पवार यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांची संवाद साधताना राज्य सरकारला दिला आहे.
एसटी कामगारांचे पगार पुन्हा रखडण्याची शक्यता?एसटी विलीनीकरण्याच्या मुद्द्यावर जवळपास सहा ते सात महिने एसटी कर्मचाऱ्यांनी मोठा लढा दिला होता. कर्मचाऱ्यांच्या या लढ्यानंतर काहीसं यशही आल. तेव्हाच तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने दर महिन्याला जवळपास ३५० कोटी रुपये एसटी महामंडळाला मदत म्हणून देऊ करण्याचे निश्चित केलं होती. याबाबतची तरतूद अर्थसंकल्पात देखील करण्यात आली होती. त्यानुसार दर महिन्याला 350 कोटी रुपये एसटी महामंडळाला वेतन करण्यासाठी राज्य सरकारकडून दिले जात होते. मात्र मागील दोन महिन्यापासून राज्य सरकारने 350 कोटी ऐवजी केवळ शंभर कोटी रुपये एसटी महामंडळाला दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर एसटी महामंडळाला 350 कोटी रुपये दर महिन्याला मिळाले नाही तर, कर्मचाऱ्यांचा पगार रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दसरा दिवाळी अशा ऐन सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांचे वेतन ढकण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारकडून मदत मिळत नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीत देखील पैसे भरण्यात आलेला नाही अशी माहिती समोर येत आहे.
आर्थिक विवंचना उभी राहणार :एस टी महामंडळाचा दर महिन्याचा एकूण खर्च साडेसहाशे कोटी रुपये आहे. तर महिन्याला केवळ 450 कोटी रुपये उत्पन्न एसटी महामंडळाला मिळते. ती महामंडळात एकूण 90 हजारांच्यावर कर्मचारी असून त्यांच्या वेतनासाठी जवळपास 350 कोटी रुपये लागतात. तर तिथेच दर महिन्याला इंधन खर्च अडीचशे कोटी रुपयांपर्यंत आहे. तर इतर खर्च 90 ते 100 कोटी रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे जवळपास साडेतीनशे कोटी रुपये दर महिन्याला पुढील तीन वर्ष दिले जाईल असं तात्काली महाविकास आघाडी सरकारने एसटी महामंडळाच्या समस्यांवर तोडगा काढला होता. मात्र गेल्या दोन महिन्यापासून मदतीचे साडेतीनशे कोटी रुपयांपैकी महिन्याला प्रत्येकी 100 कोटी रुपये मिळाल्याने एसटी महामंडळाच्या पुढे आर्थिक विवंचना उभी राहणार आहे.