मुंबई -क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची बाधा होण्याची संभाव्यता असते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारद्वारे 'शस्त्र' हे भ्रमणध्वनी आधारित वैशिष्ट्यपूर्ण 'अँड्रॉइड ॲप' केंद्र सरकारच्या संबंधित विभागाद्वारे तयार करण्यात आले ( Shhastra App For TB ) आहे. या अत्याधुनिक अँड्रॉइड ॲपमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयात न जाता देखील क्षयरोग विषय प्राथमिक चाचणी घरबसल्या करता येणार आहे, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आवाजाचे व खोकण्याचे विश्लेषण - क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची बाधा होण्याची संभाव्यता असते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार द्वारे 'शस्त्र' हे भ्रमणध्वनी आधारित वैशिष्ट्यपूर्ण 'अँड्रॉइड ॲप' केंद्र सरकारच्या संबंधित विभागाद्वारे तयार करण्यात आले आहे. या 'अँड्रॉइड ॲप'चे महत्त्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या ॲपद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांचा आवाज व खोकण्याचे 'रेकॉर्डिंग' केले जाते. 'रेकॉर्ड' करण्यात आलेल्या या आवाजाचे व खोकण्याचे विश्लेषण हे 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' आधारित अत्याधुनिक प्रणालींच्या आधारे करण्यात येते. ज्याद्वारे क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक स्तरावरील निदान होते. ह्या विश्लेषणाच्या आधारे ज्यांना क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक निदान झाले आहे. त्या व्यक्तींची वैद्यकीय चाचणी करुन बाधा झाल्याबाबतचे अंतिम निदान केले जाते, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांनी दिली आहे.