महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maratha Reservation मुंबईत मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष, नांदेडमधल्या हदगावात कडकडीत बंद - Govt ignores hunger workers

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या Maratha Reservation मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. हदगावसह तामसा-निवघा या महत्वाच्या बाजारपेठांमध्ये बंद पाळण्यात strict lockdown Hadgaon आला

Maratha Reservation
मराठा आरक्ष

By

Published : Aug 18, 2022, 8:44 PM IST

नांदेड मराठा समाजाच्या आरक्षणाच्या Maratha Reservation मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. हदगावसह तामसा-निवघा या महत्वाच्या बाजारपेठांमध्ये बंद पाळण्यात strict lockdown Hadgaon आला. या बंदमुळे आज रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. दत्ता पाटील नावाचे कार्यकर्ते मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषणाला Fasting in Azad Maidan बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला आता आठ दिवस उलटले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चाललीय, असा आरोप आंदोलकांनी केला. या उपोषणकर्त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी हदगाव तालुक्यातील मराठा समाजाने आज बंदची हाक दिली. या बंदमध्ये सगळेच व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेत.

मराठा समाजाच्या अपेक्षा काय? राज्यात शिंदे-फडवणीस सरकार Shinde-Fadwanis Govt अस्तित्वात आल्याने मराठा समाजाला आरक्षण आणि इतर सवलतीचा लाभ मिळेल अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे. त्याच भावनेतून मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनांच्या तयारीत आहे. विशेषत: मराठवाड्यात सर्वाधिक संख्येने असणारा मराठा समाज हा शासकीय सेवासुविधा पासून कोसो दूर आहे. यातील गरीब मराठा समाजाचे सगळे अस्तित्व हे शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र, बदलत्या निसर्ग चक्रात शेतीचे उत्पन्न साथ देत नाहीये. त्यामुळे सरकारने आता तरी मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी हदगांव तालुक्यातील दत्ता पाटील हडसणीकर हे मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषण करत आहेत. मात्र त्यांच्या उपोषणाला आता नऊ दिवस होत आले तरी त्यांच्या उपोषणाची अद्याप कुणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या उपोषणाकडे आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज हदगाव तालुक्यात बंद पुकारण्यात आलाय.

हेही वाचाRaigad Suspected Boat हरिहरेश्वरमधील संशयास्पद बोटीबाबत महत्वाची माहिती, या देशातील असल्याचे निदर्शनास

ABOUT THE AUTHOR

...view details