मुंबई: आर्यन खान ड्रग्ज तस्करी प्रकरणी एनसीबी चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर चुकीच्या तपासासाठी योग्य ती कारवाई करण्यास सरकारने सक्षम प्राधिकरणाला सांगितले आहे. समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकारने यापूर्वीच कारवाई केली आहे. ( Competent Authority to take appropriate action against Sameer Wankhede )
Sameer Wankhede : चुकीच्या तपासाचा फटका समीर वानखेडेंना बसणार सरकारच्या कारवाईच्या सुचना - समीर वानखेडे यांच्यावर कारवाई
आर्यन खान ड्रग्ज तस्करी प्रकरणी एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर चुकीच्या तपासासाठी योग्य ती कारवाई करण्यास सरकारने सक्षम प्राधिकरणाला सांगितले आहे.

कर्डिलिया ड्रग्ज क्रूझ प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलीक पहिल्या दिवसापासून म्हणत होते की आर्यन खानला अडकवण्यात आले आहे. आता याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? हा हेतुपुरस्सर कट नव्हता का? असा प्रश्न असे एक ट्विट नवाब मलिक यांची मुलगी सना यांनी शेअर केले आहे. या सोबत त्यांनी सत्याचा नेहमी विजय होतो !! असे म्हणले आहे.
हेही वाचा :Video : आर्यन खानला का मिळाली क्लीन चिट, एनसीबी अधिकाऱ्यांनी केला खुलासा, म्हणाले, व्हॉट्सअप चॅट...