महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यपालांनी भेट नाकारल्याच्या काँग्रेसचा आरोप; काँग्रेसच्या विनंतीवरून भेट नाकारल्याचे राज्यपालांचे स्पष्टीकरण - भगत सिंग कोश्यारी काँग्रेस बैठक रद्द राज्यपाल कार्यालय स्पष्टीकरण

काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ED Enquiry ) यांच्या चौकशी सत्रामुळे काँग्रेस संतप्त झाली असून याचे पडसाद राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने राजभवनावर धडक दिली. दरम्यान, राज्यपालांनी भेट नाकारल्याचा आरोप काँग्रेसने केला. राज्यपालांनी आरोप फेटाळून लावत, काँग्रेसच्या विनंती मुळेच भेट रद्द केल्याचे म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.

Governor Office Clarification On Congress visit
Governor Office Clarification On Congress visit

By

Published : Jun 16, 2022, 7:35 PM IST

Updated : Jun 16, 2022, 8:26 PM IST

मुंबई -काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ED Enquiry ) यांच्या चौकशी सत्रामुळे काँग्रेस संतप्त झाली असून याचे पडसाद राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने राजभवनावर धडक दिली. दरम्यान, राज्यपालांनी भेट नाकारल्याचा आरोप काँग्रेसने केला. राज्यपालांनी आरोप फेटाळून लावत, काँग्रेसच्या विनंती मुळेच भेट रद्द केल्याचे म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या आरोपाचे खंडन -नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. सलग तीन दिवस या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शुक्रवारी राहूल गांधी यांना चौकशीसाठी हजर राहावे, असे समन्स बजावण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस संतप्त झाली आहेत. देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन निदर्शने केली जात आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या नेत्यांनी आज आंदोलने केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी राजभवनवर धडक देत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यपालांनी भेट नाकारली, असा आरोप काही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. मात्र, राज्यपाल कोशारी यांनी काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले राज्यपाल -काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले, एच के पाटील आदींच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाला १६ जून २०२२ रोजी दुपारी ४.३० वाजता राजभवन येथे भेटीची वेळ दिली होती. परंतु आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाकडून आलेल्या विनंतीनुसारच ही भेट रद्द केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी राजभवन मुंबईत नाहीत. त्यामुळे शिष्टमंडळाची भेट राजभवनाने रद्द केल्याचे वृत्त तथ्यहीन असून काही नेत्यांकडून गैरसमज पसरवला जात असून हे चुकीचे आहे.

हेही वाचा -Devendra Fadnavis On Ajit Pawar : अजित पवारांविरोधात षड्यंत्र; देहुतील भाषणावरून फडणवीसांचा गौप्यस्फोट

Last Updated : Jun 16, 2022, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details