मुंबई - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 'जय भवानी...जय शिवाजी’ चा जयघोष यावेळी करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह महापौर महाडेश्वर, शिवसेना नेते सुभाष देसाई व इतर नगरसेवकांच्या हस्ते शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
राज्यपालांच्या हस्ते शिवाजी पार्कवर महाराजांना पुष्पहार घालून अभिवादन - सी. विद्यासागर राव
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह महापौर महाडेश्वर, शिवसेना नेते सुभाष देसाई व इतर नगरसेवकांच्या हस्ते शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
शिवजयंती महाराष्ट्रातच नाहीतर जगभरात साजरी केली जाते. शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही, असे गौरव उद्गार काढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूर, महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे, असे गौरवोद्गार महापौर महाडेश्वर यांनी काढले. राष्ट्रनिर्माणाची मुहूर्तमेढ शिवाजी महाराजांनी जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीच रोवली होती. पिढ्यानपिढ्या महाराज आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. हेसुद्धा तितकच खरं आहे, पुन्हा शिवाजी होणे नाही, असेही ते म्हणाले.