मुंबई -एकीकडे राज्यपालांनी भाजपला 48 तास दिले तर शिवसेनेला फारच कमी वेळ दिला. हे कुठेतरी चुकीचे आहे, राज्यपालांची ही भूमिका संशयास्पद असून हे काही न्यायाला धरून नाही, असा आरोप ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केला.
प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रीया हेही वाचा... ' देशाची अर्थव्यवस्था येत्या १० ते १५ वर्षात १० लाख कोटी डॉलरची होईल'
प्रकाश शेंडगे यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भुमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्यात चिंतेचे वातावरण तयार झाले असून, याला राज्यपलाच जबाबदार असल्याचे शेंडगे म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागेल असे वाटत नाही. शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सरकार बनेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असेही ते म्हणाले.
हेही वाचा...सेनेला दिलेली मुदत संपली मात्र; सत्ता स्थापनेचा दावा कायम, काँग्रेस राष्ट्रवादीचा निर्णय नाहीच