महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Reaction of MLA Devendra Bhuyar : राज्यपाल महाराष्ट्राला कलंक : आमदार देवेंद्र भुयार - विधानसभा अध्यक्षांची निवडणूक

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ( Legislative Special Session ) आज विधानसभा अध्यक्षांची ( Speaker of the Assembly ) निवड करण्यात आली. यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अगोदरच आक्षेप घेतला होता. तसेच हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही निवडणूक झाली. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यातील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार ( Independent MLA Devendra Bhuyar )यांनी दिलेली प्रतिक्रिया.....

Independent MLA Devendra Bhuyar
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार

By

Published : Jul 3, 2022, 5:30 PM IST

मुंबई : राज्यपाल ( Governor ) हा राज्याचा प्रमुख ( Head of state ) असतो. त्याने जनतेच्या हिताचे आणि विकासाचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा असते. राज्यपालांनी सरकारला मार्गदर्शन करावे आणि सरकारच्या सल्ल्याने कारभार करावा हे संकेत असताना राज्यपाल भगतसिंह कोसारी हे अतिशय पक्षपाती आणि राजकारणी राज्यपाल आहेत, अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार देवेंद्र भुयार ( Independent MLA Devendra Bhuyar ) यांनी व्यक्त केली आहे

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची प्रतिक्रीया

अध्यक्षांची निवड प्रक्रिया चुकीची :शिवसेनेतून फुटलेल्या 39 आमदारांचा, पक्षाचा व्हीप झुगारल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी असतानाही अध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली आणि कामकाज रेटून नेण्यात आले. ही अत्यंत चुकीची बाब आहे, न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना, अशा पद्धतीने अध्यक्षांची निवड करणे चुकीचे असल्याचे मत आमदार भुयार यांनी व्यक्त केले आहे

राज्यपाल महाराष्ट्राला कलंक:राज्यपाल भगतसिंह कोशारी हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक आहेत. या राज्यात विकासाचे राजकारण अपेक्षित असताना राज्यपाल अतिशय विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवून चुकीचं राजकारण करीत आहेत, असा आरोपही देवेंद्र भुयार यांनी केला.


हेही वाचा :Rahul Narvekar Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड, सर्वात तरुण अध्यक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details