मुंबई -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे (controversial statement). महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असे वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावं असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले -आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबईबाबत एक मोठं विधान केलं आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात. म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख कडाडले - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( governor bhagat singh Koshyari ) यांनी मुंबई व महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) जोरदार हल्ला चढवला आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे. ते खपवून घेतले जाणार नाही. तसेच त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे असे ठाकरे म्हणाले मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सविस्तर वाचा...
शरद पवार - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) सारखे व्यक्ती जर, अशी वागत असतील तर लोकांनी लोकशाहीवर विश्वास ठेवायचा कसा हा मोठा प्रश्न आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी म्हटले आहे. ते धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस भवनच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सविस्तर वाचा...
राष्ट्रवादी आणि मनसेचे नेते भडकले -महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असं वादग्रसत्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावं असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.
संजय राऊत - राजस्थानी आणि गुजराती माणसांच्या हातात मुंबईतील आर्थिक नाड्या आहेत. मुंबईच्या विकासात गुजराती आणि राजस्थानी माणसांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे गुजराती आणि राजस्थानी माणूस गेला, मुंबई आर्थिक राजधानी राहील काय, असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी केला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर आता टीका करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्यावर टीका केली असून थोडक्यात काय तर मराठी माणूस भिकारडा आहे. हा 105 हुतात्म्यांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा...
अमोल मिटकरी -महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय. महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.