मुंबई -महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच राज्यात विधानसभा निकालानंतर कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकला नाही. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या प्रस्तावानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे सध्या राज्याचा कारभार राज्यपालांच्या हातात आहे. यामुळे शेतकऱ्यांना अद्याप काही मदत न मिळाल्याने त्या बाबतीत राज्यपालांना प्रश्न विचारला असता, त्यांनी या प्रश्नावर उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत उत्तर देण्यास टाळाटाळ हेही वाचा... 'शिवसेना नक्कीच हिंदुत्वाबाबत काँग्रेसची भूमिका बदलेल'
राज्यपाल महोदय एका कार्यक्रमात पाहुणे म्हणून आले असता, त्यांना 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रश्नावर न बोलता, आपण याबाबतीत लवकरच काय ते कळवू, असे म्हटले.
हेही वाचा... प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही बोलेन; विदर्भातील पीक नुकसानीच्या पाहणीनंतर पवारांचे आश्वासन
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी सर्वच पक्ष राज्यपालांकडे मागणी करत आहेत. परंतु, अद्याप राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या मदती विषयी काहीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे एका कार्यक्रमात राज्यपाल आले असता, त्यांना याबाबत प्रश्न विचारला. मात्र, प्रतिनिधीच्या प्रश्नावर बोलने राज्यपालांनी टाळले.