मुंबई -महाविकास आघाडीचे सरकार लवकरच धार्मिक स्थळे उघडण्याच्या संदर्भात एक आदर्श कार्यप्रणाली आखेल. त्यानंतरच महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडण्यात येतील असे मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
धार्मिक स्थळे उघडण्याच्या संदर्भात सरकर एक आदर्श कार्यप्रणाली आखेल - अस्लम शेख - mumbai ideal procedure for opening religious places
सीमेवर चीनच्या चाललेल्या आक्रमक हालचाली, घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी या मुद्यांवर मौन राहायचे आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या धार्मिक संस्थांना पुढे करुन आपला राजकीय अजेंडा चालवायचा, यावरुन भाजपचे नेते किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत याच प्रात्यक्षिक मिळते, असा टोला देखील त्यांनी लगावला.
![धार्मिक स्थळे उघडण्याच्या संदर्भात सरकर एक आदर्श कार्यप्रणाली आखेल - अस्लम शेख government will adopt an ideal procedure for opening religious places say mumbai city guardian minister aslam shaikh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9299806-1092-9299806-1603548927031.jpg)
धार्मिक संस्थांना पुढे करणे भाजपचा अजेंडा
धार्मिकस्थळ उघडण्यासाठी मोर्चा काढण्यापेक्षा प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यासाठी जर विश्व हिंदू परिषदेचे लोक रस्त्यावर उतरले असते, तर ते जनतेच्या फायद्याचे ठरले असते. सीमेवर चीनच्या चाललेल्या आक्रमक हालचाली, घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी या मुद्यांवर मौन राहायचे आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या धार्मिक संस्थांना पुढे करुन आपला राजकीय अजेंडा चालवायचा, यावरुन भाजपचे नेते किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत याच प्रात्यक्षिक मिळते, असा टोला देखील त्यांनी लगावला.