मुंबई:पर्यटन मंत्रालयाचा यावर्षीचा वार्षिक अहवाल (Ministry of Tourism annual report) नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये भारत सरकारने नमूद केलेलं आहे की, कोरोना महामारीच्या साथी नंतरही सत्तर लाख प्रवासी भारतात आले (tourist in India) आणि 2020 च्या तुलनेने त्यात 10 टक्के त्यात वाढ झाली आहे. मात्र टुरिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाने याबाबत शंका व्यक्त केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पर्यटन व्यवसाय अद्यापही फुललेला नाही. या पर्यटकांमध्ये विदेशात राहणारे भारतीयच अधिक आहेत.(more NRIs among foreign tourists)
पर्यटन वाढावे यासाठी विविध योजना: देशातील पर्यटन व्यवसाय बहरावा यासाठी प्रत्येक शासन विविध योजना आणि उपक्रम राबवते. भारत सरकारने देखील अनेक उपक्रम राबवले आहेत. भारतीय संस्कृती व भारतातील विविध पर्यटन स्थळ पाहण्यासाठी विदेशातील लोक अधिकाधिक यावे यासाठी काही मोहीमाही हाती घेतल्या आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही अपेक्षित विदेशी पर्यटक भारतात आले नसल्याचं टुरिस्ट असोसिएशनचं म्हणणं आहे.
व्हिसाबाबत नियम फार कडक -यासंदर्भात इंडियन असोसिएशन ऑफ टूर्स ऑपरेशन यांचे प्रमुख राजू मेहरा (दिल्ली) यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला असता ते म्हणाले की, सरकारचा नुकताच प्रकाशित झालेला अहवाल ज्यामध्ये सत्तर लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक आल्याचे म्हटलेलं आहे, यामध्ये बहुतांशी आपल्या भारतातीलच नागरिक आहेत जे विदेशात राहतात. तुलनेने विदेशी पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे. विदेशी पर्यटकांची संख्या कमी का, या प्रश्नाच्या उत्तरा दाखल मेहरा म्हणाले की, कोरोनाच्या आधी जेवढे विदेशी पर्यटक भारतात आले होते, त्याच्या दहा टक्के सुद्धा पर्यटक यावर्षी आले नाहीत. हॉंगकॉंग, चीन अशा अनेक देशांमध्ये अजूनही व्हिसाबाबत नियम फार कडक आहेत. कोरोनाचा काही ठिकाणी अजूनही प्रभाव आहे. त्यामुळे भारतात विदेशी पर्यटकांचा अद्यापही पाहिजे तसा ओघ नाही. हा व्यवसाय अजूनही सावरलेला नाही.
सरकारची आकडेवारी फसवी: भारत सरकारच्या अहवालामध्ये विदेशी पर्यटकांची आकडेवारी दिलेली आहे. या आकडेवारी नुसार यावर्षी देशात दहा लाख विदेशी पर्यटक आले. जे पर्यटक आले त्यातही अप्रवासी भारतीयांची संख्या ५० लाखापेक्षा अधिक आहेत. भारतात एकूण आंतरराष्ट्रीय पर्यटक सत्तर लाख आहेत. टुरिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया ने म्हटले आहे की, सरकार तसं आकडेवारीत म्हणू शकते. पण वेगवेगळी आकडेवारी पाहिली असता विदेशी पर्यटक भारतात फारच कमी आलेले आहेत. जे काही विदेशी पर्यटक आलेले आहेत ते केवळ १० लाखच आहेत.