मुंबई- अनलॉक 5मध्ये कोणत्या गोष्टी सुरू होणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. याबाबत बोलताना शिवसेना प्रवक्ता सुनील प्रभू यांनी यांनीही सरकार टप्प्या टप्प्याने सर्व उघडण्यासाठी सकारात्मक असून मुंबईची लाइफलाइनही लवकरच सुरू होईल, असे सांगितले आहे.
रेल्वे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक - सुनील प्रभू
रेल्वे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. यात हळूहळू विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जात आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाशी त्या संदर्भात चर्चा सुरू असून लोकलच्या अधिक फेऱ्या सुरू झाल्यानंतर लोकांना परवानगी देता येईल, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्याबाबत प्रभू बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासन टप्पाटप्प्याने सर्व सुरू करण्यासाठी तयार आहे. मुंबईच्या अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत, त्या देखील आम्ही सुरू करणार आहोत. रेल्वे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. यात हळूहळू विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जात आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाशी त्या संदर्भात चर्चा सुरू असून लोकलच्या अधिक फेऱ्या सुरू झाल्यानंतर लोकांना परवानगी देता येईल. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लोकल सेवा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासोबत अन्य काही गोष्टींना परवानगी दिली जाणार आहे, अनलॉकचा वेग कमी आहे. ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याचप्रमाणे अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. एकदा सुरू झालेली गोष्ट पुन्हा बंद करावी लागू नये, असा आमचा प्रयत्न आहे, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्याबाबत प्रभू बोलत होते.