महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 19, 2021, 3:16 PM IST

Updated : Mar 19, 2021, 6:51 PM IST

ETV Bharat / city

कोरोना कहर.. खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती, सरकारचे आदेश

कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने शुक्रवारी नवे निर्बंध लागू केले. यानुसार खासगी कार्यालये व सरकारी आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली असून कार्यालयांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

government Order of only 50% attendance in all private offices
government Order of only 50% attendance in all private offices

मुंबई - राज्य शासनाने कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व सरकारी आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.

सध्या राज्यात कोरोनाने हाहाकार माजलेला आहे. काल राज्यभरात जवळपास 25 हजाराच्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. आत्तापर्यंतचा रुग्ण सापडण्याचा हा उच्चांक आहे. राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखं चित्र निर्माण झाले आहे. म्हणूनच राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्याचे आदेशच काढले आहेत. राज्य शासनाने कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता "मिशन बिगीन अंतर्गत" राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये केवळ पन्नास टक्केच कर्मचारी एका वेळेस काम करू शकणार आहेत. या निर्णयामुळे महानगरांमध्ये होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जातोय. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.


सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय मेळावे रद्द-

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी असे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.
हे ही वाचा - पाच फोन कॉल, हिरेन- वाझे भेट अन दहा मिनिटांची चर्चा; एनआयएच्या हाती महत्वाचा पुरावा

महाराष्ट्र सरकारकडून नव्या करोनासंबंधी नव्या मार्गदर्शक सूचना -

  • कोरोनाबाधितांच्या संख्येत आज मोठी वाढ झाली आहे. केंद्राने महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 31 मार्च पर्यंतच्या कालावधीसाठी महाराष्ट्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्वाना मास्क घालणं बंधनकारक असल्याचे सरकारने म्हटलं आहे.
  • त्यानुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि चित्रपटगृह केवळ ५० टक्के क्षमतेनेच कार्यरत राहू शकतील.
  • कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कारणांसाठी एकत्र येण्यावर बंदी असणार.
  • लग्न समारंभात केवळ 50, तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना उपस्थित राहता येईल.
  • आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयात केवळ 50 टक्के उपस्थिती असेल.
  • सर्वाना मास्क घालणं बंधनकारक आहे. मास्कशिवाय प्रवेश देऊ नये.
  • कोरोना नियमांचं पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तैनात करायची जबाबदारी आस्थापनांची असेल.
  • शरीराचं तापमान मोजणं सक्तीचं करण्यात आलं आहे, ताप असलेल्या व्यक्तिला प्रवेश दिला जाणार नाही.
  • धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्याच्या संख्येवरही मर्यादा घालण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांसाठी जागोजागी हँड सनिटायजर ठेवणही अनिवार्य करण्यात आलं आहे. या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
Last Updated : Mar 19, 2021, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details