महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उत्तर भारतीयांना आरक्षण देण्यास राज्य सरकार सकारात्मक -वडेट्टीवार - vijay Vadettivar

उत्तर भारतीयांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

By

Published : Sep 3, 2021, 9:26 PM IST

मुंबई - उत्तर भारतीयांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

'बरेच उत्तर भारतीय महाराष्ट्राचा स्थायिक आहेत किंवा जन्माला आले आहेत'

कांग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वादाट्टीवर यांना भेटून राज्यसरकारकडे ही मागणी केली. उत्तर भारतीय अनेक वर्षापासून मुंबई आणि महाराष्ट्रात राहतात. बरेच उत्तर भारतीय महाराष्ट्राचा स्थायिक आहेत किंवा जन्माला आले आहेत. त्यामुळे राज्यातील आरक्षणाचा लाभ उत्तर भारतीयांनाही मिळावा अशी मागणी नसीम खान यांनी वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत राज्यसरकार सकारात्मक असल्याचे, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 1969 सालापासून जे उत्तर भारतीय महाराष्ट्रात राहत आहेत. त्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.

'राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र लिहिण्याचे आश्वासन'

महाराष्ट्रातील ओबीसी, एससी, एसटी, एनटी वर्गामध्ये उत्तर भारतीय लोकांच्या जातीचा ही समावेश करण्यात यावा अशी मागणी नसीम खान यांनी केल्यानंतर, याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र लिहिण्याचे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी नसीम खान यांना दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details