महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक! पनवेलमध्ये नॉन कोविड गर्भवती प्रसूती केंद्राची सुरुवात - डॉ नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेलअंतर्गत हे 20 खाटांचे बिगर कोरोना गर्भवती प्रसूती केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोळीवाडा (उरण नाका) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये हे केंद्र सुरू व्हावे म्हणून पनवेल संघर्ष समितीने प्रयत्न केले होते.

माता प्रसुती केंद्र
माता प्रसुती केंद्र

By

Published : Aug 4, 2020, 2:52 PM IST

नवी मुंबई- कोरोना महामारीच्या काळात गर्भवतींना उपचार मिळणे आव्हानात्मक ठरत आहे. हे लक्षात घेवून पवनेलमध्ये सरकारी बिगर कोरोना (नॉन कोविड) गर्भवती प्रसूती केंद्र उभारण्यात आले आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेलअंतर्गत हे 20 खाटांचे बिगर कोरोना गर्भवती प्रसूती केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोळीवाडा (उरण नाका) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये हे केंद्र सुरू व्हावे म्हणून पनवेल संघर्ष समितीने प्रयत्न केले होते.

पनवेल परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गर्भवती महिलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सर्व सरकारी रुग्णालये ही कोविड (कोरोना) रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जाणाऱ्या गर्भवती महिलांना कोरोना होण्याची शक्यता आहे. यामुळे संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पनवेल महापालिका, रायगड जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार महापालिकेने गर्भवती मातांसाठी आरोग्य व्यवस्था सुरू केल्याचे कडू यांना सांगितले आहे.

गर्भवती महिलांसाठी स्वतंत्ररित्या रुग्णालय नाही. ही खंत नागरिकांना सतावत असल्याने कांतीलाल कडू यांनी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांच्याकडून परवानगी घेतली होती. तसेच 20 खाटा आणि आरोग्याच्या सामुग्री प्राप्त करून घेतल्या आहेत. डॉ. स्वाती नाईक यांची विशेष नियुक्ती करण्यात आलेली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details