मुंबई -संपूर्ण राज्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टीने त्यांनी प्रशासनाने आवश्यक त्या सूचना देऊन ठेवल्या आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी सकाळी सात वाजता राज्याचे मुख्य सचिव मनोक्रमा श्रीवास्तव यांच्याशी याबाबत चर्चा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, सातारा, कोल्हापूर व मुंबई या भागात अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व पालक सचिवांशी ही त्यांनी चर्चा केली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तेथील लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आषाढी पूजेचा मान दिल्याचा आनंद? - पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आषाढी एकादशीला पूजेसाठी त्यांना आमंत्रण दिले. त्यावर बोलताना यंदा पंढरपूरला एकादशी पूजेचा मान मला व माझ्या कुटुंबीयांना भेटला याचा मला फार आनंद आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.