महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चर्चा अजून संपली नसून बैठकांचे गुऱ्हाळ राहणार सुरूच.. - महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा संघर्ष

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग.. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या मुंबईत बैठका... शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना राज्यपालांना भेटण्याची शक्यता... शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा 16-15-12 असा फॉर्म्युला असू शकतो, सुत्रांची माहिती...

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष

By

Published : Nov 22, 2019, 10:14 AM IST

Updated : Nov 22, 2019, 11:22 PM IST

मुंबई- महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसाठीच्या राजकीय घडामोडींना आता वेग आल्याचे दिसत आहे. नवी दिल्ली येथे दोन्ही काँग्रेसने शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी अनुकुलता दाखवल्यानंतर, आता राज्यातील घडामोडी अधिक वेगाने घडताना दिसत आहेत. गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईत भेट झाली. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पक्षीय स्तरावर बैठकही पार पडली आहे. त्यामुळे लवकरच राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक झाला आहे. यावेळी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला सर्वांनी सहमती दिल्याची माहिती शरद पवार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.

महाविकासआघाडीची बैठक

Live महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी -

7.20 PM -मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला सर्वांनी सहमती दिल्याची माहिती शरद पवार यांनी या बैठकीनंतर दिली

7.00 PM -महाविकासआघाडीची बैठक संपली

5.00 PM -महाविकासआघाडीची दीड तासांपासून बैठक सुरू असून यात मुख्यमंत्री पदासह विधानसभा अध्यक्षांच्या पदासाठीही चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

4.10 PM - महाविकासआघाडीची नेहरु सेंटरमध्ये बैठक; मुख्यमंत्री पदावर होणार चर्चा?

1:30 PM

धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांच्या बैठकीला सुरूवात

धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीसहीत सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू.

1:20 PM

सत्तास्थापनेचा आज दावा करणार नाही

शिवसेनेच्या आमदारांची बैठक आज पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. त्यातच त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. दरम्यान, आज आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.

1:00 PM

आदित्य व उध्दव ठाकरे पालिकेसाठी रवाना

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे मुंबई महानगरपालिका भवनाकडे रवाना झाले. शिवसेनेच्या वरळी विभागातील किशोरी पेडणेकर यांची मुंबई महापौर पदी निवड झाली आहे.

12:50 PM

मुख्यमंत्री म्हणून आमदारांनी कोणाच नाव एकत्र घेतलं नाही.. आमदार मुंबईत राहणार आहेत... ट्रायडेंड किंवा ललित हॉटेलमध्ये आमदार जाणार - भास्कर जाधव

12:30 pm

शिवसेनेचे आमदार मुंबईतच राहणार

शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतच एकत्र राहणार आहेत. ते जयपूरला जाणार नाहीत. लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना आमदारांकडून देण्यात आली आहे. मातोश्रीवर पार पडललेल्या बैठकीनंतर आमदारांकडून प्रतिक्रिया देण्यात आली.

12:20 PM

मातोश्रीवरील सेना आमदारांची बैठक संपन्न

शिवसेना आमदारांची मातोश्रीवरील बैठक संपली आहे. यानंतर आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख पक्षाचा अंतिम निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य असणार, असल्याचे म्हटले आहे.

12:05 PM

उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, शिवसेना आमदारांची बैठकीत मागणी

उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी शिवसेना आमदारांनी बैठकीदरम्यान केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच त्यांच्या नंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचं नावही आघाडीवर असल्याची माहिती आहे.

11:00 AM

शिवसेना आमदारांच्या बैठकीला सुरुवात

मुंबईत शिवसेना आमदारांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमदारांशी संवाद साधणार आहेत. राज्यातील सर्व शिवसेनेचे आमदार मोतोश्रीवर दाखल..

10:00 AM

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचाच उमेदवार विराजमान होईल. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील चित्र स्पष्ट होईल. आता दुसऱ्या कोणी मुख्यमंत्रिपद काय तर इंद्रपद दिले तरी माघार घेणार नाही, अशी कठोर भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली. पुढील पाच वर्षे राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. या निर्णयावर तिन्ही प्रमुख पक्षांची चर्चा झाली असून त्यांनी सहमतीही दर्शवली आहे. शिवसेनेने घेतलेला हा निर्णय स्वाभिमानाने घेतलेला आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी घेतलेला आहे. लवकरच महाराष्ट्राला एक कणखर नेतृत्व मिळेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी राज्यातील जनतेची आणि लाखो शिवसैनिकांची इच्छा आहे. ते राज्यातील जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या भावना समजून घेऊन त्याला मान देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

9:25 AM

  • शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत सत्तावाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती
  • मुख्यमंत्री सेनेचा तर दोन उपमुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादीचे राहण्याची शक्यता
  • अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री वाटपाचा फक्त प्रस्ताव, अजून चर्चा नाही
  • सेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, कृषी खाते जाण्याची शक्यता
  • काँग्रेसला महसूल, उर्जा, उच्च तंत्रशिक्षण, ग्रामविकास मिळण्याची शक्यता
  • राष्ट्रवादीकडे गृह, अर्थ, वैद्यकीय शिक्षण, सहकार जाण्याची शक्यता
  • सांस्कृतिक खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही

9:27 AM

मातोश्रीवर आज होणाऱ्या बैठकीत काही वेळातच सेना आमदार दाखल होतील. आजच्या बैठकीत उध्दव ठाकरे सत्ता वाटपाची माहिती आमदारांना देतील... त्यानंतर पुन्हा आमदारांची रवानगी हॉटेलमध्ये करण्यात येईल...

9:31 AM

सत्ता स्थापनेचा पेच सुटला....?

आमदारांच्या बैठकीत उध्दव ठाकरे किमान समान वाटपाबाबत चर्चा करतील. काल रात्री उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्यात जी सत्तास्थापन व मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली यात संजय राऊत यांच नाव आघाडीवर असल्याची चर्चा. अरविंद सावंत एकनाथ शिंदे अनिल देसाई या नावांवर चर्चा. संजय राऊत यांच्या नावाला शरद पवार यांनी अधिक पसंती दिल्याची सूत्रांची माहिती

9:13 AM

शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला 16- 15- 12 असा असू शकतो

  • शिवसेना - मुख्यमंत्री 11 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री
  • राष्ट्रवादी - उपमुख्यमंत्री 11 कॅबिनेट, 4 राज्यमंत्री
  • काँग्रेस- उपमुख्यमंत्री 9 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री
Last Updated : Nov 22, 2019, 11:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details