मुंबई - मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) कार्यक्रमावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार घणाघात केला. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची आमची मागणी होती. परंतु, सरकारने पाच दिवसांचे तोकडे अधिवेशन घेतले आहे. संसदीय कामकाजात सरकारला रस नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. विधीमंडळ संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक संपल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Maharashtra Assembly Winter Session : पाच दिवसांचे तोकडे हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घ्या - फडणवीस
नेहमीप्रमाणे अधिवेशन न घेण्याचा या सरकारची आतापर्यंतची राहिली आहे आणि त्याप्रमाणेच चार ते पाच दिवसांचे अधिवेशन ठेवण्यात आले आहे. एकूण कामकाजाचे पाच दिवस आहेत आणि त्यातील पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडले जाणार आहेत. त्यामुळे हे चार दिवसांचे अधिवेशन ( Maharashtra Assembly Winter Session) आहे. प्रश्नांना सामोरे जाण्याची आणि अधिवेशन घेण्याची मानसिकता सरकारची दिसत नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दोन वर्षात एकाही प्रश्नाचे उत्तर नाही -
राज्याचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) मुंबईत होणार आहे. अधिवेशनाचा (Assembly Winter Session) कालावधी कमी आहे. ४ ते ५ दिवसांचे तोकडे अधिवेशन असून पहिला दिवस पुरवणी मागण्यांचा असणार आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी केली. मात्र अधिवेशन टाळण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारकडून होतो आहे, असे फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले. तसेच तीन दिवस ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन (Assembly Winter Session) घ्या, असा पर्याय आम्ही सरकार समोर ठेवला. पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची यासाठी बैठक होणार आहे. अधिवेशन कालावधी त्यानंतर निश्चित केला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे, असे फडणवीस म्हणाले. २ वर्षात एकाही अतारांकित प्रश्न, लक्षवेधीला सरकारने उत्तर दिलेले नाहीत. याबाबत मी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रलंबित अतारांकित प्रश्नांना येत्या अधिवेशनात उत्तरे दिली जातील. रोज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी घेण्यात येणार असल्याची ग्वाही, सरकारने दिल्याचे फडणवीस म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात -
अधिवेशन नागपूरलाच झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. सरकार जाणीवपूर्वक अधिवेशन नागपूरला घेत नाही. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे कारण यामागे दिले जात आहेत. त्यामुळे मार्च महिन्यातील होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात (budget session in Nagpur) घ्यावे, अशी मागणी केली आहे, असे फडणवीस म्हणाले.