महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 27, 2021, 12:33 PM IST

ETV Bharat / city

अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी २८६० कोटींची वाढीव मदत

अतिवृष्टीमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या सुमारे ३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना भरपाई म्हणून राज्य सरकारने सुमारे २८६० कोटींची वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अध्यादेश जारी केले आहेत.

अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी २८६० कोटींची वाढीव मदत
अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी २८६० कोटींची वाढीव मदत

मुंबई : अतिवृष्टीमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या सुमारे ३५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना भरपाई म्हणून राज्य सरकारने सुमारे २८६० कोटींची वाढीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अध्यादेश जारी केले आहेत. १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

३५ लाख ७४ हजार हेक्टर शेतीचे नुकसान
पालघर, औरंगाबाद, परभणी, जालना, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नागपूर, गडचिरोली, धुळे, नंदूरबार, नांदेड आणि अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. शेतीचे, नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. मनुष्यहानी देखील झाली. या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांपेक्षा मदत देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांच्याबाबत नुकसानबाबतचे अहवाल संबंधित विभागीय आयुक्तांना सादर केले आहेत.

त्यानुसार ४६ लाख ५६ हजार ८६६ शेतकऱ्यांकडील ३५ लाख ७४ हजार ९४० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे २ हजार ८६० कोटी ८४ लाख रुपये वाढीव निधी देण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना मदत दिल्यानंतर त्यात पारदर्शकता असावी यासाठी संबंधित यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करणार असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details