महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मतदारांसाठी 'फ्लॅश मॉब'द्वारे जनजागृती; मुंबईकरांसाठी अनोखा उपक्रम - केंद्रीय निवडणूक निरीक्षक बिजल शहा

आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी ! चला करुया मतदानाची तयारी ! या आशयाचा मतदानाचा संदेश देत शहरातील विविध भागात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी फ्लॅश मॉबद्वारे जनजागृती केली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबईकरांसाठी अनोखा उपक्रम केला आहे.

By

Published : Oct 11, 2019, 9:39 AM IST

मुंबई - आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी ! चला करुया मतदानाची तयारी ! या आशयाचा मतदानाचा संदेश देत शहरातील विविध भागात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी फ्लॅश मॉबद्वारे जनजागृती केली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबईकरांसाठी अनोखा उपक्रम केला आहे.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक बिजल शहा यांच्या प्रमुख उपस्थित शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात येत असून, या संकल्पनेत नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. दि.21 ऑक्टोबरला मतदान होणार असून, मुंबईकरांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होऊन उत्साह वाढावा, मतदानाची टक्केवारी वाढवावी, यासाठी हा प्रयत्र करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. संबंधित फ्लॅश मॉबमध्ये पथनाट्य, नृत्य, देशभक्तीपर गीतातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात येत असून, विविध सादरीकरणातून जनजागृती करण्यात येत आहे.

हेही वाचामालेगाव येथे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून दिला मतदान जागृतीचा संदेश

पुढील काळात, मुंबई सेंट्रल, सायन, सीआर 2 मॉल, जयहिंद कॉलेज, रुईया कॉलेज, खालसा कॉलेज, अशा प्रमुख ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन व ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी याजनजागृती कार्यक्रमाचे आयोजन झाले त्या ठिकाणी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details