महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मेट्रो कारशेड अखेर कांजुरमार्ग 'त्याच' जागेवरच! 43.7 हेक्टर जागा राखीव

विकास आराखड्यात बदल करत कांजुर मार्ग येथील 43.76 हेक्टर जागा मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्यात आली आहे. त्यानुसार या जागेचा वापर कारशेड, कास्टिंग यार्ड आणि मेट्रोच्या इतर कामासाठी गेला जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

metro car shed
मेट्रो कारशेड

By

Published : Mar 10, 2021, 9:00 PM IST

Updated : Mar 10, 2021, 10:14 PM IST

मुंबई -मेट्रो 3, (कुलाबा-वांद्रे-सिपझ) आणि मेट्रो 6 (लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी-कांजुरमार्ग) कारशेड कांजुरमार्ग येथील प्रस्तावित जागेवरच उभारण्याचे अखेर राज्य सरकारने निश्चित केले आहे. कारण, आज नगर विकास खात्याकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कांजूरला कारशेड करणे भविष्यासाठी हिताचे ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेद सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायालयात जनेतला न्याय मिळेल. तीन लाईनची प्रस्तावित जागेवर कार शेड मिळेल. कोणतेही काम फुकट जाणार नाही. बदलापूरमधील नागरिकांनाही शहरात येता येणार आहे. ही कारशेड पुढील ५० ते १०० वर्षांसाठी फायद्याचे आहे.

राज्य सरकारची अधिसूचना

विकास आराखड्यात बदल करत कांजुर मार्ग येथील 43.76 हेक्टर जागा मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्यात आली आहे. त्यानुसार या जागेचा वापर कारशेड, कास्टिंग यार्ड आणि मेट्रोच्या इतर कामासाठी गेला जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा-वृद्धाच्या कोरोना लसीकरणास विलंब, वाद- धक्काबुक्की- थेट पंतप्रधानांकडे तक्रार


मेट्रो 3 कारशेड आरेत तयार करण्यास विरोध झाल्याने महाविकास आघाडी सरकारने मेट्रो 6 चे कारशेड हे कांजुर मार्गाच्या जागेवर हलविले. पण, याला भाजपने जोरदार विरोध केला. त्याचवेळी या जागेवर केंद्र सरकारने आणि खासगी बांधकाम विकासकाने मालकी असल्याचा दावा केला. हे प्रकरण न्यायालयात असून यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे. या समितीनेही कांजुरमार्गच्या जागेला पसंती दिल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रकरणी अजून न्यायालयाकडून अंतिम निर्णय येणे बाकी आहे. मात्र तरीही सरकारची ही अधिसूचना कारशेडच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हेही वाचा-महाशिवरात्री: ईटीव्ही भारतवर पाहा, 'शिवम सुंदरम्'

अखेर जागेचे आरक्षण बदलले

मेट्रो 6 साठी कांजुरमार्गच्या जागेची निवड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ने 2016 मध्ये केली. या जागेच्या प्रस्तावाला तत्कालीन फडणवीस सरकारने मंजुरीही दिली होती. तर पुढे मेट्रो 3 आणि 4 चे कारशेड याच जागेवर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मेट्रो 14 चे एक स्थानकही येथे उभारण्यात येणार आहे. मात्र, ही जागा आता वादात अडकली आहे. दरम्यान एमएमआरडीएने या जागेवरील मूळ आरक्षण बदलण्याची मागणी केली होती. त्यानुसार अखेर आज 43. 76 हेक्टर जागेचे बाग, उद्यान, पुनर्वसन, पोलीस निवासस्थान, पालिका शाळा अशा अन्य काही गोष्टीसाठी असलेले आरक्षण बदलत ही जागा मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्यात आली आहे. यासाठी काही अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. त्यानुसार न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच या जागेचा वापर करता येणार आहे.

हेही वाचा-६० ते ८०च्या दशकातील दुचाकींचा संग्रह असणारा कर्नाटकातील 'सिव्हिल इंजिनिअर'

Last Updated : Mar 10, 2021, 10:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details