मुंबई - रेशन धारक नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता रेशन रेशन दुकानात (Ration Shop), चहा (Tea), कॉफी (Coffee), साबण, हॅण्डवॉश, वॉशिंग पावडर आणि शाम्पूही मिळणार आहे. राज्यातील 52 हजार दुकानदारांना या वस्तूंची विक्री करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने (Department of Food and Civil Supplies) दिले आहेत. आतापर्यंत गहू, तांदूळ, तेल आणि साखर या गोष्टी खरेदी करता येत होत्या.
'या' वस्तू मिळणार -
अन्न-नागरी पुरवठा (Food Civil Supplies) आणि ग्राहक संरक्षण विभागाचे (Department of Consumer Protection) सहसचिव तातोबा कोळेकर (Joint Secretary Tatoba Kolekar) यांनी काल एक निर्णय घेतला आहे. त्यात असे म्हटले आहे की, राज्यातील रेशन दुकानांतून आता खुल्या बाजारातील अंघोळ आणि धुण्याचा साबण, डिटर्जंट पावडर, शाम्पू, चहा-कॉफी विकण्यासाठी शासन परवानगी देत आहे.