मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर. (7 सप्टेंबर 2021)पासून दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेस धावणार आहे. या मोदी एक्स्प्रेसमधून प्रवाशांना मोफत प्रवासाबरोबर जेवण मिळणार आहे. तसेच, यामध्ये लोकांच्या जेवणाचीही काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
गणेशभक्तांसाठी खूशखबर! दादर ते सावंतवाडी धावणार मोदी एक्सप्रेस, नितेश राणेंची माहिती
मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर. (7 सप्टेंबर 2021)पासून दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेस धावणार आहे. या मोदी एक्स्प्रेसमधून प्रवाशांना मोफत प्रवासाबरोबर जेवण मिळणार आहे. तसेच, यामध्ये लोकांच्या जेवणाचीही काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
'जेवण देखील देणार'
भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज एक समाज माध्यमावर एक व्हिडीओ शेअर करत कोकणातील गणेशभक्तांना ही आनंदाची बातमी दिली आहे. नितेश राणे यांनी सांगितले की, गेली 9 वर्षापासून मी गणपतीला बसेस सोडतो. 100 रुपयामंध्ये या बस सोडवल्या जातात. कोकणवासीयांसाठी गणपती हा खूप मोठा सण आहे. चाकरमानी कितीही व्यस्त असले तरी सर्व बाजूला सारून आपल्या गावाकडे वळतो. यावर्षी पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी यावेळी बस न सोडता मी पूर्ण ट्रेन सोडणार आहे. मोदी एक्स्प्रेस या नावाची ट्रेन यावर्षी कोकणातल्या आणि विशेषत: सिंधुदुर्गातल्या चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जाणार आहे. एक हजार 800 जणांनाही ट्रेन सिंधुदुर्गकडे घेऊन जाणार आहे. ही ट्रेन 7 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता दादर स्टेशनवरून प्लॅट फॉर्मनंबर 8 वरुन सोडणार आहोत. हा पूर्ण प्रवास विनामूल्य असेल. या पूर्ण प्रवासामध्ये आम्ही जेवण देखील देणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी यावेळी दिली आहे.