महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विक्रोळीतील कन्नमवार नगरात घरफोडी, १ लाखाहून अधिक सोन्याचा ऐवज लंपास - gold robbery in kannamwar nagar

कन्नमवार नगर १ येथील संजय जुवेकर यांच्या घरातून चोरट्यांनी एक लाख त्रेचाळीस हजारांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला... चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे...

विक्रोळीत घरफोडी सोन्याचा ऐवज लंपास

By

Published : Nov 7, 2019, 8:03 PM IST

मुंबई - विक्रोळीच्या कन्नमवार नगर-१ मध्ये बुधवारी पहाटे इमारत क्रमांक-५० च्या तिसऱ्या मजल्यावरील संजय जुवेकर यांच्या घरी चोरी झाली. यावेळी चोरांनी एक लाख त्रेचाळीस हजारांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे घरफोडी

हेही वाचा... सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून ४ घरफोड्या, तर एका दुकानातील मुद्देमाल लंपास

संजय रामचंद्र जुवेकर यांचा 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय आहे. आपल्या मुलाबरोबर ते या इमारतीत राहतात. गेले दोन दिवस ते व्यवसायानिमित्त पुण्याला गेले होते, यावेळी घरी मुलगा एकटाच होता. मंगळवारी रात्री तो घराबाहेर गेला होता. तेव्हा बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला. त्याने घरात डोकावून पहिले असता त्याला घरातील सामान अस्थावस्थ पडलेले आढळले. घरातील दागिने चोरीला गेल्याचे समजले. त्याने तत्काळ वडिलांना आणि विक्रोळी पोलिसांना याची माहिती दिली. विक्रोळी पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून घरातील इतरत्र पडलेल्या साहित्याची तपासणी करत शोध सुरू केला. कन्नमवार परिसरात घरफोडीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

ABOUT THE AUTHOR

...view details