सोनसाखळी चोराला लोहमार्ग पोलिसांनी केली अटक - मुंबई लोकल ट्रेन सोनसाखळी चोर बातमी
रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या दादर फलाट 3 वर विरार-चर्चगेट लोकल आली असता, लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने गळातून खेचून चोराने पळ काढला. प्रवाशाने यासंदर्भात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोराचा मागोवा घेण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून पाच दिवसात चोराला अटक केली.
मुंबई - तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आले आहे. परिणामी पुन्हा लोकलमध्ये गर्दी वाढू लागली आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. मोबाईल, मौल्यवान वस्तूची चोरी होण्याची प्रकरणे वाढली जात आहे. नुकताच एक प्रवासी बेसावधपणे प्रवास करत असताना साखळी चोरी करण्याची घटना घडली.
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांची कारवाई -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या दादर फलाट 3 वर विरार-चर्चगेट लोकल आली असता, लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने गळातून खेचून चोराने पळ काढला. प्रवाशाने यासंदर्भात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोराचा मागोवा घेण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून पाच दिवसात चोराला अटक केली. या घटनेतून या चोराकडून 20 ग्रॅम वजनाची सोनसाखळी तपासदरम्यान जप्त केली आहे. तर, आरोपीची चौकशी करण्यात येत आहे आहेत.
पोलिसांची डोकेदुखी वाढली -मुंबई आणि उपनगरील वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वेचा उपनगरी रेल्वे प्रवास अत्यंत जिकरीचा झाला आहे. काही वर्षांत लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोकलच्या डब्यातील प्रवास म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे. या गर्दीचा फायदा घेईन मोबाईल, मौल्यवान वस्तूची चोरी होण्याची प्रकरणे वाढली आहे. त्यामुळे पोलिसांची सुद्धा डोकेदुखीत वाढ झाली आहे. या चोरट्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पोलीस गस्त वाढविण्यात येत आहेत.