सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर - चांदीचे प्रतिकिलो दर
गुरुवारी दर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,000 रुपयांपेक्षा कमी झाली आहे. सोन्याचे दर 600 रुपयांनी कमी झाले असून चांदीनेही 1400 रुपयांपेक्षा अधिक नीचांक गाठला आहे. कालच्या जोरदार घसरणीनंतर आजही एमसीएक्सवरील 10 ग्रॅम सोन्याचे दर घसरुन 44,770 रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.
मुंबई -जर आपण सोनं विकत घेण्याचा विचार करत असाल तर सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. आज गुरुवारी दर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,000 रुपयांपेक्षा कमी झाली आहे. सोन्याचे दर 600 रुपयांनी कमी झाले असून चांदीनेही 1400 रुपयांपेक्षा अधिक नीचांक गाठला आहे. कालच्या जोरदार घसरणीनंतर आजही एमसीएक्सवरील 10 ग्रॅम सोन्याचे दर घसरुन 44,770 रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. काल 45,000 रुपयांपर्यंत सोन्याचे दर घसरले होते. या आठवड्यात आतापर्यंत सोन्याचे दर 550 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. येणाऱ्या काळात सोन्याच्या किमतीत अजूनही घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील वर्षी, कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. मागील वर्षी सोन्याने ग्राहकांना 43% रिटर्न्स दिला. उच्च पातळीच्या तुलनेत सोन्याचे दर 25% टक्क्यांनी घसरले आहेत.