महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मातृभूमी गोवा आणि पणजी मतदारसंघाच्या रक्षणासाठी काँग्रेसमध्ये' - goa congress latest news

सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ज्ञ डिलाईला फर्नांडिस यांनी सोमवारी आपल्या सुमारे 100 समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

डिलाईला फर्नांडिस
डिलाईला फर्नांडिस

By

Published : Dec 1, 2020, 12:11 PM IST

पणजी - मातृभूमी गोवा आणि पणजी मतदारसंघाच्या रक्षणासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ज्ञ डिलाईला फर्नांडिस यांनी व्यक्त केली. सोमवारी त्यांनी आपल्या सुमारे 100 समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

'समाजसेवेचे व्रत पुढे नेण्यासाठी राजकारणात'

माजी पोलीस निरीक्षकांची मुलगी असलेल्या फर्नांडिस म्हणाल्या, विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक नाही. केवळ प्रामाणिकपणे राजकारण करत समाजसेवेचे व्रत पुढे नेण्यासाठी राजकारणात आले आहे. काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे पक्ष कार्यालयात स्वागत केले. यावेळी पणजी विधानसभा निरीक्षक धर्मा चोडणकर, एम. के. शेख, सेबी मिरांडा, समीर पै रायकर आदी उपस्थित होते.

'काँग्रेसप्रवेशाचा ओघ वाढेल'

प्रदेशाध्यक्ष चोडणकर म्हणाले, की पक्षामध्ये नव्या लोकांचे स्वागत आहे. यापुढे कालावधीत अधिकाधिक लोक पक्षप्रवेश करतील अशी खात्री आहे. दुसरीकडे गोवा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अलिकडेच पक्षप्रवक्ते उर्फान मुल्ला यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, कोविड-19च्या महामारीमुळे स्थगित असलेली गोव्यातील जिल्हापंचायत निवडणूक याच महिन्यात होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारे पक्षातून येण्याजाण्याचा काय परिणाम होतो हे लवकरच समजणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details