महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लहान मुलांचे नाव कोविन ऍपवर नोंदणी करून लसीकरण केंद्रावर जा - महापौरांचे आवाहन - मुंबई लसीकरण बातमी

आजपासून मुंबईत 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस (Mumbai Covid-19 Vaccination) दिली जाणार आहे. केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून पालकांनी आपल्या मुलांना कोविन ऍपवर (Cowin App) नोंदणी करून लसीकरण केंद्रावर घेऊन जावे असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केले आहे.

Child vaccination
Child vaccination

By

Published : Jan 3, 2022, 11:45 AM IST

मुंबई - आजपासून मुंबईत 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस (Mumbai Covid-19 Vaccination) दिली जाणार आहे. पालिकेने जाहीर केलेल्या केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून पालकांनी आपल्या मुलांना कोविन ऍपवर (Cowin App) नोंदणी करून लसीकरण केंद्रावर घेऊन जावे असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केले आहे. तसेच लहान मुलांना लसीचे डोस देऊन ओमायक्रॉनवर मात करण्यास सहकार्य करावे असेही आवाहन महापौरांनी केले आहे.

महापौरांचे आवाहन

महापौरांचे आवाहन
मुंबईत कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढला आहे. हा प्रसार लहान मुलांना होऊ नये म्हणून आजपासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार पालिकेने मुंबईमधील 9 केंद्रांवर आजपासून लसीकरण सुरू केले जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लहान मुलांना लस दिली जाणार आहे. 15 ते 18 वयोगटातील सर्व लहान मुलांना लसीचे डोस देऊन कोरोना आणि ओमायक्रॉनवर मात करण्यास सहकार्य करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना
- सन २००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी हे पात्र राहतील.
- आज पासून लाभार्थ्यांना कोविन ऍपवर मोबाइल नंबर नोंदणी सुरु.
- लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करून लसीकरण करण्याचीही सुविधा
- १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी केंद्रावर फक्त कोवॅक्सिन लसच उपलब्ध असेल याबाबत खबरदारी घ्यावी.
- ज्या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करणे शक्य नसेल अशा ठिकाणी स्वतंत्र रांगा असाव्यात.

या ठिकाणी होणार लसीकरण -

  • भायखळा आर.सी. कोविड लसीकरण केंद्र
  • सायन सोमय्या जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  • वरळी एनएससीआय डोम, जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  • बांद्रा बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र एच / प
  • गोरेगाव नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  • मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  • दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र
  • कांजूरमार्ग क्रॉम्प्टन अँड ग्रीव्ह्स जम्बो लसीकरण केंद्र
  • मुलुंड आर सी जम्बो कोविड लसीकरण केंद्र

हेही वाचा -Maharashtra Corona Update : राज्यात आज ११ हजार 877 कोरोना पॉझिटिव्ह, तर ओमायक्रॉनच्या 50 रुग्णांची भर

ABOUT THE AUTHOR

...view details