मुंबई - गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यामुळे त्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना हजेरी न देता त्यांच्याकडून सक्तीने रजा महामंडळाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे हा कामगार कराचा उल्लंघन असून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची नुकसान होणार आहे. त्यामुळे संचार बंदी असलेल्या जिल्हातील एसटी कर्मचाऱ्यांना लॉकडाउन हजेरी देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना लॉकडाउन हजेरी द्या; कामगार संघटनेची मागणी - एसटी कामगार संघटना
गेल्या महिन्यापासून राज्याच्या विवीध जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी जाहिर केली आहे. अशा ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाकडून कमी प्रमाणात एसटीच्या फेऱ्या चालविल्या जात आहे. त्यामुळे चालक, वाहकांना सदर कालावधीत कामगिरी मिळत नाही, अशा कामगारांना हजेरी देणे आवश्यक आहे.
कामगार कराराचा भंग-
गेल्या महिन्यापासून राज्याच्या विवीध जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी जाहिर केलेली आहे. अशा ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाकडून कमी प्रमाणात एसटीच्या फेऱ्या चालविल्या जात आहे. त्यामुळे चालक, वाहकांना सदर कालावधीत कामगिरी मिळत नाही अशा कामगारांना हजेरी देणे आवश्यक आहे. तसेच सन २०१२-२०१६ च्या कामगार करारातील कलम क्रमाक ५५ अन्वये संचारबंदी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी प्रशासनाने प्रवाशी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असेल तर अशावेळी चालक, वाहकांना त्या दिवसाची हजेरी देण्याचे मान्य केलले आहे. सदर तरतुदीची अशा प्रसंगी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र, अकोला, अमरावती, यवतमाळ व वर्धा विभागात कर्मचाऱ्यांना हजेरी न देता त्यांच्याकडून सक्तीने रजा घेतलेली आहे. हा प्रकार नियमबाह्य असून कामगार कराराच्या तरतुदीचा भंग करणारे आहे. त्यामुळे कामगार कराराची काटेकोर अंमलबजावणी करत कर्मचाऱ्यांना लॉकडाउन हजेरी देण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून करण्यात आलेली आहे.
लॅाकडाऊन प्रेझेंटी द्या-
कोविड काळात जिवाची बाजी लावून एसटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली आहे. व आताही देत आहेत. कोरोनाने अनेक सहकारी बाधीत झाले तर शंभरापेक्षा अधीक सहकाऱ्यांना कोरोनाने आपला जीव गमवावा लागला. कोरोना काळात ज्या आस्थापना बंद राहतील, अशा कामगारांना LDP (लॅाकडाऊन प्रेझेंटी) नियमानुसार मिळायलाच हवी तर २०१२-१६ च्या वेतनकरारातील कलम ५५ नुसार संचारबंदी, नैसर्गीक आपत्ती काळात जर वाहतुक बंद असेस तर त्या दिवसाची हजेरी मिळावी अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी, मात्र कुठल्याही कर्मचाऱ्याच्या खात्यावरील रजा कापू नयेत अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
हेही वाचा-ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर