महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रियकराने व्हाट्सअप आणि मोबाईलनंबर ब्लॉक केल्याने तरुणीने केली प्रियकराच्या घरी आत्महत्या? - Girlfriend commits suicide

मुंबईतील दहिसर परिसरामध्ये एका 20 वर्षीय तरुणीने, प्रियकराने व्हाट्सअप आणि मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने प्रियकराच्या दहिसर येथील रेल्वे पटरीच्या बाजूला असलेल्या घरात गळफास लावून घेतल्याची घटना समोर आली आहे. प्रशांत लोकरे असे या महिलेचे नाव असून ती सोमवारी सकाळी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

प्रियकराने व्हाट्सअप आणि मोबाईलनंबर ब्लॉक केल्याने तरुणीने केली प्रियकराच्या घरी आत्महत्या?
प्रियकराने व्हाट्सअप आणि मोबाईलनंबर ब्लॉक केल्याने तरुणीने केली प्रियकराच्या घरी आत्महत्या?

By

Published : May 19, 2022, 8:54 AM IST

मुंबई -मुंबईतील दहिसर परिसरामध्ये एका 20 वर्षीय तरुणीने, प्रियकराने व्हाट्सअप आणि मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने प्रियकराच्या दहिसर येथील रेल्वे पटरीच्या बाजूला असलेल्या घरात गळफास लावलेल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. प्रशांत लोकरे असे या महिलेचे नाव असून ती सोमवारी सकाळी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. ती महिला आणि तिचा 27 वर्षीय प्रियकर गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रविवारी रात्री दोघेही कोणाच्या तरी लग्नात गेले होते. त्यानंतर महिलेने तिच्या प्रियकरासोबत रात्री त्याच्या घरी राहायचे आहे, असा आग्रह धरला. मात्र, त्याने तिची मागणी मान्य न करता महिलेला घरी जाण्यास सांगितले.

प्रियकराच्या घरीच आत्महत्या? -प्रियकराने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की यानंतर ती निघून गेली. परंतु लवकरच प्रियकराला फोन करू लागली आणि तिला त्याच्या घरी यायचे आहे असे सांगितले. तरुणीला प्रियकराने सांगितले की, रात्री घरी येऊ नको. या परिसरात ड्रग्सचे व्यसनात रात्री अनेक लोक फिरत असतात. हे सांगितल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचा व्हाट्सअप नंबर आणि मोबाईल कॉलिंग नंबर ब्लॉक केला. त्यानंतर प्रेयसी प्रियकराच्या घरी येऊन विचारू लागली की व्हाट्सएप नंबर ब्लॉक का केला आणि ती तिथेच थांबली. सकाळी प्रियकर झोपेतून उठला तेव्हा प्रेयसीने दुपट्ट्याने फाशी लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर घटनास्थळी बोरवली रेल्वे स्टेशनमधील जीआरपी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बोरिवली युनिटने अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आता ही आत्महत्याच आहे का याबाबत पोलिसांचा तपास सुरू राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details