मुंबई - मागच्या आठवड्यात विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्हच्या (Pen Drive) माध्यमातून मोठा खुलासा केला होता. यात भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना जाणून-बुजून एका प्रकरणात अडकवण्यासाठी कशा पद्धतीचे षड्यंत्र रचण्यात आले याबाबत 125 तासांचे रेकॉर्ड पेन ड्राईव्हमध्ये होते. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी पुण्यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station Pune) तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडूनच करावी, अशी मागमी महाजन यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे.
Girish Mahajan Pen Drive Case : पेन ड्राईव्ह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी; गिरीश महाजनांची याचिका - पेन ड्राईव्ह प्रकरण सीबीआय चौकशी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्हच्या (Pen Drive) माध्यमातून मोठा खुलासा केला होता. यात भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना जाणून-बुजून एका प्रकरणात अडकवण्यासाठी कशा पद्धतीचे षड्यंत्र रचण्यात आले याबाबत 125 तासांचे रेकॉर्ड पेन ड्राईव्हमध्ये होते. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागमी गिरीश महाजन यांनी केली आहे.
प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तक्रार : राज्यातील सरकार विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचत आहे. या कामात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना हाताशी धरले जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केला होता. याबाबत अध्यक्षांकडे पेन ड्राईव्ह देखील दिला होता. त्यामध्ये १२५ तासांचा डाटा असून, सरकारच्या षड्यंत्राचे पुरावे त्यात असल्याचा दावा त्यांनी केला होता. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, या पूर्ण प्रकाराबाबत गिरीश महाजन यांनी पुण्यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे देण्यात आले असले तरीसुद्धा याबाबत जे काही पुरावे सादर केले त्यामध्ये मंत्र्यांचेसुद्धा नाव समाविष्ट असल्याने याची चौकशी सीआयडीकडून होईल अशी अपेक्षा आम्हाला नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.
सीबीआय चौकशीसाठी जनहित याचिका दाखल : या प्रकरणाची गंभीरता बघता, ज्या पद्धतीचे पुरावे देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले आहेत ते पाहता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, असेही महाजन यांनी सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. जेणेकरून या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी सीबीआयकडून करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.