महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 3, 2021, 5:00 PM IST

ETV Bharat / city

घाटकोपरची कोमल जैन सीएच्या परीक्षेत देशात पहिली

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए सीपीटी व अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झालेला आहे. या परीक्षेत 800 पैकी 600 गुण घेऊन मुंबईतील कोमलने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

Komal
Komal

मुंबई -घाटकोपरची कोमल जैन या 22 वर्षाचा तरुणीने सीएच्या परीक्षेत देशात पहिला नंबर पटकावला आहे. कोमल ही माटुंगा येथील पोदार कॉलेजमधील विद्यार्थीनी असून तिने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे.

मुंबईची कोमल देशात पहिली

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए सीपीटी व अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झालेला आहे. या परीक्षेत 800 पैकी 600 गुण घेऊन मुंबईतील कोमलने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सुरत येथील मुदित अग्रवाल आणि मुंबईची राजवी नाथवानी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या परीक्षेत दोन्ही ग्रुप घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४.५ टक्के म्हणजे १९ हजार २८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अशी आहे आकडेवारी

यंदा फक्त ग्रुप १चा निकाल १२.८ टक्के तर ग्रुप २चा निकाल ३१ टक्के इतका लागला आहे. यंदा ३२ हजार विद्यार्थ्यांनी ग्रुप १ तर २८ हजार विद्यार्थ्यांनी ग्रुप २ची परीक्षा दिली. घाटकोपरला राहणाऱ्या कोमलने २०१९मध्ये पोदार कॉलेजमधून बी. कॉम्.ची पदवी मिळवली. कोरोना महामारीमुळे सीएची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात झाली. या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

निकालानंतर काय म्हणाली कोमल?

देशात पहिली आल्याचे समजले आणि मला खूप आनंद झाला. माझे वडील निवृत्त अकाउंटन्ट आहेत तर आई कॉमर्स शाखेची पदवीधर असून गृहिणी आहे. यामुळे मला लहानपणापासूनच कॉमर्समध्येच करिअर करायची इच्छा होती. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कन्सल्टन्सी किंवा फायनान्स या दोनपैकी कोणत्या क्षेत्रात जायचे, याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. यंदा करोनामुळे परीक्षा सतत पुढे ढकलली जात होती. यामुळे काही प्रमाणात नैराश्य आले होते. पण अखेर आमची परीक्षा झाली आणि यश मिळाले, अशी प्रतिक्रिया ईटीव्ही भारतशी बोलताना कोमलने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details