महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्रातील जरबेराची फुले किसान रेल्वेमार्फत दिल्लीत - किसान रेल्वे बद्दल बातमी

महाराष्ट्रातील जरबेराची फुले किसान रेल्वेमार्फत दिल्लीत गेली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढले आहे.

Gerbera flowers from Maharashtra have reached Delhi by Kisan Railway
महाराष्ट्रातील जरबेराची फुले किसान रेल्वेमार्फत दिल्लीत

By

Published : Mar 13, 2021, 7:36 PM IST

मुंबई - भारतीय रेल्वेच्या किसान रेल्वेने महाराष्ट्रातील अनेक लहान शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन आणत आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील लातूर आणि उस्मानाबाद भागातील छोट्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच कुर्डूवाडी स्थानक ते दिल्लीमधील आदर्श नगरपर्यंत किसान रेल्वेमध्ये जरबेराची फुले पोहोचविली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढले आहे

महाराष्ट्रातील जरबेराची फुले किसान रेल्वेमार्फत दिल्लीत

650 जरबेराची फुलांची वाहतूक-

९ मार्च २०२१ला प्रथमच लातूर आणि उस्मानाबाद भागातील छोट्या ग्रीन हाऊसच्या शेतकर्‍यांनी कुर्डूवाडी स्टेशन ते आदर्श नगर दिल्ली पर्यंत किसान रेलमध्ये ६५० किलो वजनाची फुलांची वाहतूक केली आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पडोली, वाघोली, तेर, पनेवाडी आणि उपळा या गावात आणि लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली. एक / दोन एकर जमीन असलेले छोटे शेतकरी किसान रेल्वेमार्फत अत्यंत नाशवंत अशा फुलांची जलद आणि स्वस्त वाहतूक करून नवीन बाजारपेठेत करण्यास उत्सुक आहेत, कारण त्यांना जास्त किंमत मिळत आहे.

महाराष्ट्रातील जरबेराची फुले किसान रेल्वेमार्फत दिल्लीत

काय म्हणाले शेतकरी -

उस्मानाबादमधील दुमाळा येथील श्रीधर भीमराव काळे हे एक छोटे शेतकरी किसान रेलमुळे दिल्लीत मोठ्या आणि नवीन बाजारपेठेत पोहोचल्याबद्दल उत्साहीत आहेत. ते म्हणाले की,“फुले आता जलद आणि कमी किंमतीत बाजारात आणली जातात आणि अत्यंत फायदेशीर किंमतीला विकली जातात”. लातूर जिल्ह्यातील मुरुड खेड्यातील शेतकरी बिभीशण नाडे म्हणाले की, “किसान रेल मला दिल्लीच्या बाजारपेठेत नेते आणि माझ्या फुलांसाठी कमी वाहतुकीच्या किंमतीत अधिक किंमत मिळवून देते”.

महाराष्ट्रातील जरबेराची फुले किसान रेल्वेमार्फत दिल्लीत

61 हजार 252 टन मालाची वाहतूक-

भारतीय रेल्वेने सुरू केलेली किसान रेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात हळुवारपणे बदल घडवून आणत आहे. सोलापूर, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव, अमरावती आणि नाशिक जिल्ह्यातून फळे, भाज्या आवश्यक वस्तूंची दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि भारताच्या ईशान्य प्रदेशातील विविध नवीन बाजारपेठांमध्ये अखंड पुरवठा साखळी तयार करुन त्यांचे उत्पन्न वाढविण्यास सक्षम केले आहे. 12 मार्च 2021 पर्यंत किसान रेल्वेमध्ये महाराष्ट्रातून 61 हजार 252 टन नाशवंत शेती उत्पादने किसान रेल्वेच्या 200 फेऱ्यांमध्ये लोड करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details